HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC Bank Hikes MCLR: HDFC बँकेने केली मोठी घोषणा, ग्राहकांना मोठा झटका

HDFC ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

HDFC Bank Hikes MCLR: HDFC ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, HDFC बँकेने सर्व कर्ज कालावधीसाठी निधी आधारित मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लॅंडिंग रेट (MCLR) 5-10 बेस पॉइंट्स (bps) ने वाढवला आहे.

HDFC ग्राहकांना मोठा झटका

ही वाढ 8 ऑगस्ट 2022 पासून लागू झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉइंट्स (0.50 टक्के) वाढ जाहीर केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये आरबीआयच्या एमपीसीच्या बैठकीत महागाई (Inflation) नियंत्रित करण्याच्या उद्देशाने असा निर्णय घेण्यात आला होता.

RBI ने रेपो दरात वाढ केली

महत्त्वपूर्ण म्हणजे, केंद्रीय बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांनी शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत (RBI MPC मीटिंग टुडे) रेपो दरात 0.50 टक्के वाढीची घोषणा केली होती. या वाढीनंतर रेपो रेट 5.40 टक्के झाला. या वर्षी RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट वाढवला आहे.

रेपो रेटमध्ये वाढ

यापूर्वी मे 2022 मध्ये आरबीआयने (RBI) अचानक रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर, जून 2022 च्या एमपीसीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. अशाप्रकारे मे महिन्यापासून रेपो रेटमध्ये एकूण 1.40 टक्के वाढ झाली आहे. या वाढीमुळे तुमचे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन म्हणजेच बँकेकडून घेतलेली सर्व प्रकारची कर्जे महाग होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तान संघ जाहीर, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT