HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

HDFC ची मोठी घोषणा, Bank देणार गुंतवणूकदारांना एवढा मोठा लाभ!

HDFC बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 19 रुपये म्हणजेच 1900 टक्के लाभांश जाहीर केला आहे.

Manish Jadhav

HDFC Bank: HDFC बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर, भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँक HDFC बँकेने शनिवारी आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति इक्विटी शेअर 19 रुपये म्हणजेच 1900 टक्के लाभांश जाहीर केला आहे.

मागील वर्षासाठी घोषित केलेल्या 15.5 रुपयांच्या लाभांशापेक्षा हे जास्त आहे. यासोबतच आता कंपनीच्या गुंतवणूकदारांना या लाभांशाचा लाभ मिळणार आहे.

लाभांशाची घोषणा

इक्विटी शेअर्सवर (Shares) लाभांश मिळविण्यासाठी पात्र असलेल्या गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्याची रेकॉर्ड तारीख 16 मे 2023 ही ठेवण्यात आली आहे.

HDFC बँकेने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, "संचालक मंडळाने त्यांच्या बैठकीत 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी नेट प्रॉफिटच्या प्रत्येकी पूर्ण भरलेल्या (म्हणजे 1900 टक्के) 1 रुपये प्रति इक्विटी शेअरसाठी 19 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे."

बँकेला नफा

यासोबतच, एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) मार्च तिमाहीचे आकडेही जाहीर केले आहेत. बँकेच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ झाली आहे.

एचडीएफसी बँकेने शनिवारी जानेवारी-मार्च 2023 (Q4 FY23) साठी स्वतंत्र नेट प्रॉफिटमध्ये 16.53 टक्क्यांनी वाढ नोंदवून रु. 12,047 कोटींवर पोहोचले.

त्याचे निव्वळ व्याज उत्पन्न 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 23.7 टक्क्यांनी वाढून 23,351.8 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी रु. 18,872.7 कोटी होते.

एचडीएफसी बँक

त्याचवेळी, बँकेच्या CASA (चालू खाते बचत खाते) ठेवी 11.3 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याशिवाय त्याच्या बचत खात्यात 5,62,493 कोटी रुपये आणि चालू खात्यात 2,73,496 कोटी रुपये जमा आहेत.

31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षाच्या तुलनेत 2022-23 पूर्ण आर्थिक वर्षासाठी HDFC बँकेचा निव्वळ नफा 19.3 टक्क्यांनी वाढून 44,108.7 कोटी रुपये झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विवोने पुन्हा केला मोठा धमाका! दमदार बॅटरी, प्रोसेसरसह Vivo V60 5G लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि अफलातून फीचर्स

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

SCROLL FOR NEXT