Shiv Nadar Dainik Gomantak
अर्थविश्व

Shiv Nadar: ना अंबानी ना अदानी, शिव नाडर सर्वात मोठे देणगीदार; अझीम प्रेमजींनाही...

Shiv Nadar: शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे देणगीदार अब्जाधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत.

दैनिक गोमन्तक

Shiv Nadar: शिव नाडर हे देशातील सर्वात मोठे देणगीदार अब्जाधीशांच्या यादीत आघाडीवर आहेत. EdelGive Hurun India Philanthropy List 2022 नुसार, HCL चे संस्थापक शिव नाडर यांनी वार्षिक 1,161 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यानुसार शिव नाडर यांनी चॅरिटीसाठी दररोज तीन कोटी रुपये खर्च केले आहेत, असे म्हणता येईल.

अझीम प्रेमजींना मागे टाकले: यासह शिव नाडर (Shiv Nadar) यांनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांना मागे टाकले आहे. आत्तापर्यंत अझीम प्रेमजी हे सर्वात मोठे दाता मानले जात होते. मात्र, यावर्षी अझीम प्रेमजी यांनी वार्षिक 484 कोटी रुपयांची देणगी दिली असून ते यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.

अहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. अंबानींनी एका वर्षात 411 कोटी रुपयांची देणगी दिली आणि याच काळात बिर्ला यांनी 242 कोटी रुपयांची देणगी दिली.

अदानींचे रँकिंग: सुष्मिता आणि सुब्रतो बागची आयटी कंपनी माइंडट्रीशी संबंधित आहेत, राधा आणि एनएस पार्थसारथी 213 कोटी रुपयांच्या वार्षिक देणगीसह पाचव्या स्थानावर आहेत. तसेच गौतम अदानी (Gautam Adani) या वर्षी 190 कोटी रुपयांच्या देणगीसह यादीत सातव्या स्थानावर आहे. गौतम अदानी हे देशातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.

इन्फोसिसशी संबंधित देणगीदार: इन्फोसिसशी (Infosys) संबंधित नंदन नीलेकणी, क्रिस गोपालकृष्णन आणि एसडी शिबुलाल यांनी चॅरिटीसाठी अनुक्रमे 159 कोटी, 90 कोटी आणि 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांची क्रमवारी अनुक्रमे 9 वी, 16 वी आणि 28 वी आहे.

सर्वात तरुण परोपकारी: अहवालानुसार, झेरोधा येथील 36 वर्षीय निखिल कामथ एडेलगिव्ह हुरुन फिलान्थ्रॉपी लिस्ट 2022 मधील सर्वात तरुण परोपकारी आहे. त्यांनी आणि त्यांचे बंधू नितीन कामथ यांनी यावर्षी त्यांची देणगी 300 टक्क्यांनी वाढवून 100 कोटी रुपये केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

SCROLL FOR NEXT