#Boycott_Amazon सोशल मीडिया साइट ट्विटरवर सध्या ट्रेंड करत आहे. अनेक वापरकर्ते ई-कॉमर्स वेबसाइटवर राधा आणि कृष्णाच्या पेंटिंगला टारगेट करत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड करत असलेल्या या पेंटिंगला लोक अश्लील म्हणत आहेत. याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने एफआयआर देखील दाखल केला आहे. हिंदू संघटनेच्या सदस्यांनी बेंगळुरूमधील सुब्रमण्य नगर पोलिस स्टेशनला निवेदन दिले आणि अॅमेझॉनवर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. (Hashtag Boycott Amazon trending on Twitter for selling obscene pictures of Radha Krishna)
संघटनेचे म्हणणे आहे की जन्माष्टमी विक्री अंतर्गत, एक्झॉटिक इंडियाने त्यांच्या वेबसाइटवर हीच पेंटिंग विकली होती, ज्यावर आधीच निषेध नोंदविला गेला होता. त्यानंतरच्या ट्विटमध्ये संस्थेने म्हटले की Amazon आणि Exotic India या दोघांनी त्यांच्या वेबसाइटवरून पेंटिंग काढून टाकले आहे मात्र, ते पुरेसे नाहीये. Amazon आणि Exotic India दोघांनीही बिनशर्त माफी मागायला हवी. तसेच, हिंदूंच्या भावना पुन्हा कधीही दुखावणार नाहीत, अशी शपथ घ्यायला पाहिजे.
हिंदु जनजागृती नेत्याने ट्विट केले की, 'आता आक्रमक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज',
'अॅमेझॉन भारताच्या राष्ट्रीय आणि धार्मिक प्रतीकांचा आणि देवतांचा सतत अनादर करत आहे तसेच अॅमेझॉन पुन्हा अशा प्रकारच्या कारवायांमध्ये गुंतू नये याची खात्री करण्यासाठी भारताने आक्रमक दृष्टिकोन बाळगणे आता गरजेचे आहे!'
'भावना भडकावण्याचे आरोप याआधीही अॅमेझॉनवर केले गेले आहेत' .
अॅमेझॉनने या वादावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाहीये, याआधीही अॅमेझॉनवर अनेकवेळा देशातील हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2019 मध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये ही अमेरिकन वेबसाइट हिंदू देवतांच्या चित्रांसह कार्पेट आणि टॉयलेट सीट कव्हर देखील विकत होती. त्याच वेळी, गेल्या वर्षी, कॅनडाच्या साइटवर कर्नाटकच्या ध्वज आणि चिन्हाच्या रंगात बिकिनी विकल्याबद्दल टीका करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.