Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Gujarat: लागली रे लॉटरी ! बँक खात्यात आले 11677 कोटी रुपये, काही तासांत लाखोंची कमाई

Ramesh Sagar: गुजरातमधील एका बँकेतून धक्कादायक घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Gujarat: गुजरातमधील एका बँकेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. वास्तविक, इथे एका व्यक्तीच्या डिमॅट खात्यात अचानक 11,677 कोटी रुपये आले. त्या व्यक्तीसाठी ते लॉटरीपेक्षा कमी नव्हते. त्यानंतर या व्यक्तीने या रकमेपैकी 2 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आणि लाखो रुपये कमावले.

दरम्यान, अहमदाबादचे (Ahmedabad) रहिवासी असलेले रमेश सागर (Ramesh Sagar) हे गेल्या अनेक वर्षांपासून शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करत आहेत. एक वर्षापूर्वी त्यांनी कोटक सिक्युरिटीजमध्ये डिमॅट खाते उघडले होते. रमेश यांनी सांगितले की, 'यावर्षी 27 जुलै रोजी अचानक माझ्या खात्यात 116,77,24,43,277 रुपये आले.'

रमेश पुढे म्हणाले की, 'यानंतर मी लगेचच दोन कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले. त्यावर मला 5 लाखांचा नफाही झाला. त्यानंतर त्याच रात्री मी बँकेत (Bank) रक्कम परत केली. खात्यात जमा केलेल्या पैशातून मी बँक निफ्टी कॉल-पुटमध्ये सुमारे 2 कोटी रुपयांचा व्यवहार केला. त्याचवेळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना मला एकदा तोट्याचा विचार आला. पण मला शेअर बाजाराची माहिती होती. त्यामुळे मला फारशी भीती वाटली नाही.'

दुसरीकडे, अहवालांवर विश्वास ठेवला तर, कोटक सिक्युरिटीजने या मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. असे सांगितले जात आहे की, 'गुंतवणूकदारांचे पॅन कार्ड किंवा त्यांच्या डीमॅट खाते क्रमांकाची पडताळणी होऊ शकत नाही. त्यामुळे बँक या विषयावर भाष्य करु शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT