LPG Cylinder Rate Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Gas Rates: महागाईतून दिलासा, LPG सिलेंडर 115 रुपयांनी स्वस्त; हे आहेत नवे दर

LPG Gas Rates: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेने दिलासा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

LPG Gas Rates: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेने दिलासा दिला आहे. जनतेला दिलासा देत सरकारने व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे. 6 जुलैपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

नवीन दर काय आहेत

19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये आहे. पूर्वी तो 1859.5 रुपये होता.

आता कोलकातामध्ये (Kolkata) व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1846 रुपये असेल. पूर्वी लोकांना 1995.50 रुपये मोजावे लागत होते.

मुंबईत (Mumbai) पूर्वी 1844 मध्ये लोक व्यावसायिक सिलिंडर घेत असत, मात्र आता 1696 रुपये मोजावे लागतात.

चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 1893 रुपये आहे. यापूर्वी यासाठी 2009.50 रुपये मोजावे लागत होते.

14.2 किलो सिलेंडरची किंमत किती आहे?

दिल्लीत (Delhi) 1053 रुपये, कोलकात्यात 1079, चेन्नईमध्ये 1068.5 आणि मुंबईत 1052 रुपयांना घरगुती सिलिंडर उपलब्ध आहे. गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करतात. हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या दुकानात व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा सलग सहावा महिना आहे, जेव्हा व्यावसायिक गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 25.5 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

पीटीआयच्या अहवालानुसार, सणासुदीच्या हंगामामुळे आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत भारतात इंधनाची विक्री वाढली. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत वर्ष-दर-वर्ष (YoY) 22-26 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या सहामाहीत महिना-दर-महिना वाढ झाली आहे. 1 ते 15 ऑक्टोबर 2022 दरम्यान पेट्रोलची विक्री 22.7 टक्क्यांनी वाढून 1.28 दशलक्ष टन झाली आहे. तर याच कालावधीत 2021 मध्ये 1.05 दशलक्ष टन वापर झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT