FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

PPF-सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट, 'या' तारखेपर्यंत हे काम केले नाहीतर...

Public Provident Fund: तुम्हीही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Public Provident Fund: तुम्हीही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

31 मार्च 2023 रोजी वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे बचत योजनांमध्ये आधार अपडेट करण्यास सांगितले होते.

या अधिसूचनेद्वारे, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) किंवा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आधार आणि पॅन आवश्यक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सुकन्या समृद्धीची सुरुवात 2015 मध्ये झाली

सुकन्या समृद्धी योजना मोदी सरकारने 2015 मध्ये सुरु केली होती. या योजनेअंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी गुंतवणूक करु शकता.

आता वरीलपैकी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पॅन आणि आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

31 मार्च रोजी वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करुन आधार आणि पॅन नंबरची माहिती 6 महिन्यांच्या आत देण्यास सांगितले होते. या अधिसूचनेपूर्वी या योजनेतील गुंतवणूक (Investment) आधारशिवाय केली जात होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.

30 सप्टेंबर पर्यंत वेळ

याबाबतची माहिती वित्त मंत्रालयाने गेल्या काही दिवसांत जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या होत्या की, सुकन्या समृद्धी सारख्या पोस्ट ऑफिस योजनांमध्ये खाते उघडताना तुम्हाला पॅनकार्ड किंवा फॉर्म 60 सबमिट करावा लागेल.

त्याचवेळी, तुम्ही काही कारणास्तव पॅन सबमिट करु शकला नाही, तर तुम्ही विशिष्ट परिस्थितीत दोन महिन्यांच्या आत सबमिट करु शकता. दोन महिन्यांची ही मुदत 30 सप्टेंबर रोजी पूर्ण होत आहे.

लघु बचत योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

तुमच्याकडे आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप असणे आवश्यक आहे.

याशिवाय खाते उघडण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

जर गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पॅनकार्ड आणि आधार जमा केले नाहीत तर 1 ऑक्टोबर 2023 पासून खाते बॅन केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT