Ladali Laxmi Yojna Dainik Gomantak
अर्थविश्व

Government schemes: तुमच्या मुलीला सरकारकडून मिळणार 1 लाख 43 हजार रुपये; लगेच करा अर्ज

Ladli Laxmi Yojana Registration: नव्या भारताच्या उभारणीसाठी महिलांचे सहकार्यही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवते.

दैनिक गोमन्तक

Ladli Laxmi Yojana Registration: नव्या भारताच्या उभारणीसाठी महिलांचे सहकार्यही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवते. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत तुमच्या मुलीला सरकारकडून 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली जाईल. ही रक्कम थेट तुमच्या मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही रक्कम 5 हप्त्यांमध्ये खात्यात जमा केली जाईल. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सरकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील, चला तर मग विलंब न करता जाणून घेऊया या योजनेबद्दल...

या योजनेबद्दल जाणून घ्या

या योजनेअंतर्गत सरकार (Government) तुमच्या मुलीच्या नावावर 5 वर्षांसाठी 6-6 हजार रुपये जमा करते. अशाप्रकारे तुमच्या मुलीच्या खात्यात एकूण 30 हजार रुपये जमा होतात. यानंतर तुमच्या मुलीला या योजनेतून पैसे मिळू लागतात. या योजनेंतर्गत पहिला हप्ता तुमची मुलगी इयत्ता सहावीत गेल्यानंतर मिळतो. यावेळी तुमच्या मुलीच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात.

तसेच, नववीत गेल्यानंतर तुमच्या मुलीच्या (Girl) खात्यात 4,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. यानंतर अकरावीत प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये आणि 12 वीमध्ये प्रवेश घेतल्यावर शेवटचा हप्ता 6,000 रुपयांचा दिला जातो. यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिला 1 लाख रुपये दिले जातात. सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेतील रक्कम वाढवली असली तरी अशा प्रकारे तुम्हाला शेवटच्या हप्त्यातही वाढ मिळेल.

योजनेसाठी येथे अर्ज करा

तुम्हाला तुमच्या मुलीची आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागतील. तुम्ही सार्वजनिक सेवा केंद्र, प्रकल्प कार्यालय किंवा कोणत्याही इंटरनेट कॅफेमधून अर्ज करु शकता. येथून अर्ज केल्यानंतर प्रकल्प कार्यालय तुमचा अर्ज मंजूर करेल. जर तुम्ही संपूर्ण कागदपत्रे सादर केली नाहीत तर अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या मुलीच्या नावे 1 लाख 43 हजार रुपयांचे प्रमाणपत्र दिले जाईल. येथे तुम्ही लक्षात ठेवा की, या योजनेत पूर्वी 1 लाख 18 हजार रुपयांचे प्रमाणपत्र उपलब्ध होते, परंतु आता या योजनेत रक्कम वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bihar Elections: "मंचावर येऊन नाचायला सांगा ते नाचतील..." विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला

Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

Danish Chikna Arrested: 'चिकना'चा खेळ संपला! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खास माणसाला गोव्यातून उचललं, पत्नीलाही ताब्यात घेतलं

Horoscope: मेहनतीला योग्य फळ मिळेल, भावनिक स्थैर्य राखा; आर्थिक स्थिती मजबूत

SCROLL FOR NEXT