Government invite American companies to invest in renewable energy and power sector Dainik Gomantak
अर्थविश्व

ऊर्जा निर्मितीसाठी सरकारचे अमेरिकेतील कंपन्यांना आमंत्रण

केंद्रीय मंत्री आर के सिंह (RK Singh) यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांशी (American Investors) संवाद साधला आणि त्यांना भारतातील अक्षय ऊर्जा (Renewable Energy) आणि ऊर्जा क्षेत्रात (Power Sector) गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय मंत्री आर के सिंह (RK Singh) यांनी अमेरिकेतील गुंतवणूकदारांशी (American Investors) संवाद साधला आणि त्यांना भारतातील अक्षय ऊर्जा (Renewable Energy) आणि ऊर्जा क्षेत्रात (Power Sector) गुंतवणुकीसाठी आमंत्रित केले आहे. ऊर्जा मंत्र्यांनी (Minister Power and New & Renewable Energy) व्यापारी समुदायासोबत त्यांच्या या बैठकीदरम्यान या क्षेत्रातील भारताच्या एकूण कामगिरीवर प्रकाशही टाकला.

ऊर्जा मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, "या बैठकीने व्यापारी समुदायाला भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील विविध पैलू आणि जागतिक गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या संधींवर केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधण्यात आला ."(Government invite American companies to invest in renewable energy and power sector)

सिंग यांनी यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) च्या सदस्यांसोबत केलेल्या बैठकीतची "हवामान बदल कमी करण्यासाठी भारताची स्वच्छ , अधिक टिकाऊ आणि परवडणारी उर्जा विकसित करणे आणि भारताच्या आर्थिक वाढीला सामर्थ्य देणे" अशी थीम होती. माहिती तंत्रज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, रिन्यूएबल एनर्जी उत्पादक, बँकिंग, एव्हिएशन यासह अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांतील 50 हून अधिक उद्योजकांनी कार्यक्रमात भाग घेतला होता.

बैठकीदरम्यान सिंग यांनी या उद्योजकांना माहिती दिली की भारत 2030 पर्यंत 450 GW चे निर्धारित अक्षय ऊर्जा लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहे आणि ते म्हणाले की वीज वितरण सुधारणा आणि वीज ग्रिडमध्ये खुल्या प्रवेशास प्रोत्साहन दिल्याने अक्षय ऊर्जेचा वापर वाढणार आहे.

त्यांनी नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा प्रवेश, ऊर्जा कार्यक्षमता, उत्सर्जन तीव्रतेत घट या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आणि सौर सेल्स, मॉड्यूल आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी PLI योजनेसह भारतातील उत्पादन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या योजना त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

त्यांनी 450 GW चे महत्वाकांक्षी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पना आणि सूचनांचे स्वागत केले.

हवामान बदल, स्वच्छ ऊर्जा आणि टिकाऊपणा आणि भारत-अमेरिका स्वच्छ ऊर्जा अजेंडा 2030 भागीदारी यावरील अमेरिका आणि भारताच्या सामायिक ध्येयांना पुढे नेण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

त्याचबरोबर नुकत्याच स्थापन केलेल्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या 100 GW या प्रकल्पाबद्दल उद्योजकांनी केंद्रीय मंत्र्याचे अभिनंदन देखील केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT