PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Subsidy on LPG Cylinder: मोदी सरकार पुन्हा गॅस सबसिडी सुरु करणार! LPG कनेक्शन असणार्‍यांचे बल्ले-बल्ले

LPG Gas Subsidy: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण समितीच्या अहवालात वर्षाला सात ते आठ सिलिंडरवर सबसिडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Subsidy on LPG Cylinder: सरकारकडून जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत. यातच, ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांच्यासाठी एक मोठी खूशखबर आहे. सरकारकडून एलपीजी सिलिंडरवर सबसिडी पुन्हा सुरु होऊ शकते, अशी बातमी आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ऊर्जा संक्रमण समितीच्या अहवालात वर्षाला सात ते आठ सिलिंडरवर सबसिडी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल, अशी शक्यता आहे.

9.5 कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिले

एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी पुन्हा सुरु करण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, सरकार (Government) सबसिडी देण्याबाबत पुनर्विचार करु शकते.

'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' मोदी सरकारने 2016 मध्ये सुरु केली होती. तेव्हापासून, सप्टेंबर 2022 पर्यंत, 9.5 कोटी अल्प उत्पन्न कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत. आज देशातील 30 कोटी घरांमध्ये एलपीजीचा वापर केला जात आहे.

यापूर्वी 12 सिलिंडरवर सबसिडी मिळत होती

अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, एलपीजीच्या उच्च किंमतीमुळे देशातील 85 टक्के कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी वापरण्यास सक्षम नाहीत.

कोरोना महामारीच्या आधी सरकारकडून वर्षाला 12 सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. मात्र आता आठ सिलिंडरवर एलपीजी सबसिडी देण्याची चर्चा आहे.

अनुदानित एलपीजी सिलिंडरची संख्या कमी केल्याने, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या एकूण रकमेत 13 ते 15 टक्क्यांनी घट होईल.

तसेच, घरात स्वयंपाकासाठी वर्षाला आठ सिलिंडर लागतात. अहवालात पूर्वीप्रमाणेच श्रीमंतांच्या वतीने सबसिडी (Subsidy) सोडण्याबाबत सांगितले आहे.

याशिवाय, एका कुटुंबाने वर्षाला तीन सिलिंडर घेतल्यास त्यांना चार ते सात सिलिंडर घेणाऱ्यांपेक्षा अधिक अनुदान दिले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

देशातील तीन चतुर्थांश कुटुंबांकडे अजूनही एलपीजी कनेक्शन नाही. या कुटुंबांचे मासिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पत्नीसोबत Dinner की Sunrise बघायला आवडेल?" CM सावंतांच्या दिलखुलास गप्पा; Watch Video

Bits Pilani: 'बिट्स पिलानी मृत्यूप्रकरणी SIT नेमा'! NSUI ची मागणी; कायदा सुव्यवस्था कोलमडल्याचा आरोप

Bisons In Goa: लाखेरेत गव्यांसह रानडुकरांचा धुमाकूळ! लोकांमध्ये भीतीचे वातावरण; बागायतीची मोठी नासधूस

Goa Coastal Plan: गोवा सागरी आराखड्यास होतोय विलंब! सल्लागाराची अद्याप नेमणूक नाही; डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार काम

Goa Politics: फोंड्यात राजकीय घडामोडींना वेग! 'भाजप'मध्ये वाढला अंतर्गत संघर्ष; रवींच्या वाढदिनाकडे सर्वांच्या नजरा

SCROLL FOR NEXT