New LPG connection: एलपीजीवर सबसिडी मिळवणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी गॅस कनेक्शनवर मिळणाऱ्या सबसिडीत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, जर तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल, तर आधी ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
एलपीजी कनेक्शनवर अनुदानाची रचना बदलेल का?
अहवालानुसार, योजनेअंतर्गत नव्या कनेक्शनसाठी अनुदानाच्या विद्यमान रचनेत बदल होऊ शकतो. असे सांगण्यात येत आहे की, पेट्रोलियम मंत्रालयाने दोन नवीन संरचनांवर काम सुरु केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात एक कोटी नवीन कनेक्शन देण्याची घोषणा केली होती, परंतु आता सरकार (Government) OMCs च्या वतीने अॅडव्हान्स पेमेंट मॉडेल बदलू शकते.
अॅडव्हान्स पैसे देण्याची पद्धत बदलेल का?
अॅडव्हान्स पेमेंट कंपनी 1600 रुपये एकरकमी आकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या, OMCs EMI च्या स्वरुपात अॅडव्हान्स रक्कम आकारतात, तर या प्रकरणाची माहिती असलेल्या तज्ञांच्या मते, सरकार योजनेतील उर्वरित 1600 ची सबसिडी (Subsidy) देणे सुरु ठेवेल.
सरकार मोफत एलपीजी सिलिंडर देते
उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना 14.2 किलोचा सिलेंडर आणि स्टोव्ह दिला जातो. त्याची किंमत सुमारे 3200 रुपये आहे. सरकारकडून 1600 रुपये अनुदान मिळते, तर ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs) 1600 रुपये अॅडव्हान्स देतात. तथापि, OMC रिफिलवर EMI म्हणून सबसिडीची रक्कम आकारतात.
उज्ज्वला योजनेत नोंदणी कशी करावी
उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी करणे खूप सोपे आहे.
उज्ज्वला योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबातील महिला गॅस कनेक्शनसाठी अर्ज करु शकते.
अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com वर जाऊन तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल.
नोंदणीसाठी, तुम्हाला प्रथम एक फॉर्म भरावा लागेल आणि तो जवळच्या एलपीजी वितरकाला द्यावा लागेल.
या फॉर्ममध्ये अर्ज केलेल्या महिलेला तिचा पूर्ण पत्ता, जन धन बँक खाते आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक देखील द्यावा लागेल.
नंतर त्यावर प्रक्रिया केल्यानंतर, देशातील तेल विपणन कंपन्या पात्र लाभार्थ्यांना एलपीजी कनेक्शन जारी करतात.
ग्राहकाने EMI निवडल्यास, EMI रक्कम सिलिंडरवर (Cylinder) मिळणाऱ्या सबसिडीमध्ये समायोजित केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.