PM Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Direct Tax Collection: मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी, 10 ऑगस्टपर्यंत तिजोरीत आले 6.53 लाख कोटी!

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षात सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारला करातून मिळणाऱ्या उत्पन्नात बंपर वाढ झाली आहे.

Manish Jadhav

Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षात सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारला करातून मिळणाऱ्या उत्पन्नात बंपर वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 15.73 टक्क्यांनी वाढून 6.53 लाख कोटी रुपये झाले आहे.

सरकारने सांगितले की, 1 एप्रिल 2023 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 69,000 कोटी रिफंड जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या परताव्यापेक्षा हे प्रमाण 3.73 टक्क्यांनी अधिक आहे.

सीबीडीटीने ही माहिती दिली

आयकर विभागाने (Income Tax Department) शुक्रवारी सांगितले की, 'परतावा' समायोजित केल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 5.84 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 17.33 टक्के अधिक आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एका निवेदनात म्हटले आहे की, 10 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे असे दर्शवतात की, कर संकलनात चांगली वाढ झाली आहे.

किती परतावा जारी केला

दरम्यान, 2023-24 या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संकलनाच्या अंदाजपत्रकाच्या 32.03 टक्के कर संकलन आहे. चालू आर्थिक वर्षात 10 ऑगस्टपर्यंत 69,000 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत परत केलेल्या रकमेपेक्षा 3.73 टक्के जास्त आहे.

हा आकडा जुलै महिन्यात जाहीर झाला होता

याशिवाय, जुलै महिन्यात जारी केलेल्या आकडेवारीत असे सांगण्यात आले आहे की, चालू आर्थिक वर्षात 9 जुलैपर्यंत प्रत्यक्ष कर संकलन 15 टक्क्यांनी वाढून 5.17 लाख कोटी रुपये झाले आहे. अशा प्रकारे सरकारने (Government) एका महिन्यात 1.36 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रत्यक्ष कर जमा केला आहे.

सरकारची तिजोरी 32 टक्के भरली

सरकारी आकडेवारीनुसार, हा आकडा संपूर्ण आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 32.03 टक्के इतका आहे. याचा अर्थ असा की, 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारच्या अंदाजे कमाईपैकी 32 टक्क्यांहून अधिक रक्कम केवळ 10 ऑगस्टपर्यंत सरकारच्या तिजोरीत आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sara Tendulkar: शुभमन गिलला दिला धोका? सारा गोव्यात कोणासोबत करतेय मज्जा? 'त्या' तरुणासोबतचे फोटो झाले VIRAL

सांगोडोत्सव गाजला! मांडवीच्या पाण्यावर रंगला 'खुनी हनिमून', 'छावा' आणि ‘शरभ अवतार' देखाव्यांची जोरदार चर्चा; Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

SCROLL FOR NEXT