Advance Tax Payment: सरकारकडून करदात्यांना अग्रिम कर भरण्यासाठी (Advance Tax Payment) सातत्याने जागरुक केले जात आहे. त्याचा परिणामही दिसू लागला आहे.
होय, चालू आर्थिक वर्षात 17 जूनपर्यंत देशाचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 11.18 टक्क्यांनी वाढून 3.80 लाख कोटी रुपये झाले आहे. ही वाढ अॅडव्हान्स टॅक्स पेमेंटमुळे झाली आहे.
याबाबतची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या कार्यकाळात करदात्यांनी दिलेली ही आणखी एक आनंदाची बातमी आहे.
यापूर्वी, 2021-22 या आर्थिक वर्षात ज्यांनी आयकर भरला होता, त्यांनी विक्रमी कर जमा केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत 17 जूनपर्यंत अग्रिम कर संकलन 1,16,776 लाख कोटी रुपये होते.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 13.70 टक्के अधिक आहे. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 17 जूनपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 3,79,760 कोटी रुपये होते, ज्यात कॉर्पोरेट कर (CIT) च्या 1,56,949 कोटी रुपयांचा समावेश आहे.
सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) सह पर्सनल टॅक्स म्हणून 2,22,196 कोटी रुपये जमा झाले. ढोबळ आधारावर, परतावा समायोजित करण्यापूर्वी संकलन 4.19 लाख कोटी रुपये होते. ही रक्कम वार्षिक आधारावर 12.73 टक्के वाढ दर्शवते.
यामध्ये कॉर्पोरेट टॅक्समधील (Tax) 1.87 लाख कोटी रुपये आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह पर्सनल टॅक्स 2.31 लाख कोटींचा समावेश आहे. 17 जूनपर्यंत परताव्याची रक्कम 39,578 कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.