Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

Goa Court Ruling: खटला सुरु राहिल्यास त्याचा लग्न व नातेसंबंध आणि भविष्यात होणाऱ्या मुलांवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो, असे पीडित महिलेन कोर्टाला सांगितले.
Goa Court Verdict | Goa Fast Track Special Court
Goa Court VerdictDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संशयिताने पीडित मुलीशी लग्न केल्यामुळे बलात्कार आणि पोक्सोचा खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. २०२३ साली पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाला त्यावेळी मुलीचे वय १७ वर्ष होते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्न केल्याने आता खटल्याचा वाईट परिणाम लग्नावर व पती पत्नीच्या नात्यावर होऊ नये यासाठी खटला रद्द करण्यात यावा, अशी मागणी पीडित मुलीने कोर्टाकडे केली होती.

Goa Court Verdict | Goa Fast Track Special Court
गोव्यातील BITS Pilani पुन्हा हादरलं! आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं; वर्षातील पाचवी घटना

तसेच, किशोर वयापासून दोघेही संबंधात असल्याची माहिती देखील पीडित मुलीने कोर्टाला दिली.

कोर्टात खटला सुरु राहिल्यास त्याचा लग्न व नातेसंबंध आणि भविष्यात होणाऱ्या मुलांवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो, असे पीडित महिलेन कोर्टाला सांगितले. दरम्यान, कोर्टाने दोघांकडून प्रतिज्ञापत्र स्वीकारल्यानंतर खटला रद्द करण्यात आला.

Goa Court Verdict | Goa Fast Track Special Court
सायंकाळपर्यंत टाळा उघडा! हायकोर्टाच्या जुन्या इमारतीला टाळा ठोकल्याप्रकरणी, 'हा खूप गंभीर प्रकार आहे', म्हणत कोर्टाने गोवा सरकारला झापलं

२०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणी कोर्टात खटला सुरु झाल्यानंतर जुलै २०२४ मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com