केंद्र सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.  Dainik Gomantak
अर्थविश्व

उत्सवाच्या मुहूर्तावर महाराष्ट्र-केरळच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या दोन राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश देखील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि केरळमध्ये (In Maharashtra and Kerala) काम करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर (Good news for central employees) आहे. कारण केंद्र सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबरचे वेतन आगाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठे उत्सव आहेत. ऑगस्टमध्ये केरळात (Kerala) ओणम सण (Onam San) आहे, तर महाराष्ट्रात (Maharashtra) सप्टेंबरमध्ये गणपती उत्सव (Ganpati Utsav) असल्याने, केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या दोन राज्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश देखील सर्व विभागांना देण्यात आले आहेत.

ऑगस्टसाठी आगाऊ वेतन: वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात असलेले संयुक्त लेखा महानिदेशक T.C.A. कल्याणी यांच्या मते, सरकार या दोन राज्यांमध्ये असणाऱ्या उत्सवाला विशेष महत्त्व देत आहे. त्यामुळे विभागाने आगाऊ पगार देण्याची सर्व तयारी करण्याचे आदेश जारी देण्यात आले आहेत. 19 ऑगस्ट 2021 रोजी केरळमधील कर्मचाऱ्यांना पगार देण्यात येतील, तर महाराष्ट्रात 18 सप्टेंबर 2021 रोजी देण्यात येईल. निवृत्ती वेतनधारकाला देखील याचा लाभ मिळेल.

संरक्षण, पोस्ट आणि दूरसंचार कर्मचाऱ्यांचाही समावेश

सप्टेंबरसाठी आगाऊ वेतन: विभागानुसार हा आदेश संरक्षण, पोस्ट आणि दूरसंचार कर्मचाऱ्यांसाठीही आहे. एवढेच नाही तर ज्यांचे वेतन औद्योगिक क्षेत्राशी संबंधित आहे अशा कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ होणार आहे.

आगाऊ रक्कम म्हणून वेतन दिले

आगाऊ वेतन पेमेंट: विभागाने स्पष्ट केले आहे की हा पगार आगाऊ पेमेंट म्हणून दिला जात आहे. अंतिम पेमेंटच्या वेळी ते समायोजित केले जाईल. हे समायोजन ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पगारात करण्यात जाईल. या राज्यांमध्ये या सर्व विभागांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आरबीआयला विनंती करण्यात आली असून, बँकांना वेतन/निवृत्तीवेतन आधी जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Canal: ‘तिळारी’च्या पाण्याचा होणार प्रभावी वापर! सल्लागार नियुक्तीची निविदा; 64 गावांचे सखोल विश्लेषण केले जाणार

Assnora Accident: अस्नोडा येथे बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

Coal Handling: मुरगाव बंदरातून कोळसा हाताळणीत वाढ! मालवाहतुकही 25 टक्क्यांनी वधारली; दक्षिण-पश्चिम रेल्वेची सरस कामगिरी

'काणकोणची जनता तिसऱ्या जिल्ह्यात सहभागी होणार नाही'! गोवा फॉरवर्डच्या नाईकांचा दावा; भाजप रवी नाईक यांचा वारसा संपवत असल्याचा आरोप

Kushavati District Goa: 'कामे झाली तरच उपयोग'! नव्या ‘कुशावती’ जिल्ह्याकडून लोकांच्या अपेक्षा; काय आहेत प्रतिक्रिया, वाचा..

SCROLL FOR NEXT