7th Pay Commission | Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: DA वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, बेस‍िक सॅलरीत होणार भरघोस वाढ!

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी जानेवारी महिन्याच्या डीए वाढीबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

Manish Jadhav

7th Pay Commission Latest News: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी जानेवारी महिन्याच्या डीए वाढीबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.

डीएची वाढलेली रक्कम मार्च महिन्याच्या पगारात मिळणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

यासोबतच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातही फेरबदलाची चर्चा सुरु झाली आहे. म्हणजेच, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवे आर्थिक वर्ष खूप चांगले असणार आहे.

येत्या वर्षभरात वेतन आयोग रद्द करुन नवीन फॉर्म्युला लागू करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये अपेक्षित बदल

या बदलांतर्गत कर्मचाऱ्यांच्या (Employees) फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येऊ शकते.

आपल्या फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.

नवीन आर्थिक वर्षात त्याचा आढावा घेऊन सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा सध्याचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट आहे.

पगारात 8000 रुपयांचा बदल होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमधील बदलाबाबत दोन पक्ष आहेत. पहिल्या पक्षाचे म्हणणे आहे की, फिटमेंट फॅक्टर सध्याच्या 2.57 पट वरुन 3 पट वाढवला पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे 3000 रुपयांनी वाढ होणार आहे.

दुसरा पक्षाचे म्हणणे आहे की, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असावा. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 8000 रुपयांचा बदल होणार आहे.

पगार असा आणि इतका वाढेल

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. फिटमेंट फॅक्टरवरील निर्णयानंतर ते 26,000 रुपये होईल. मात्र, याबाबत सरकारकडून (Government) कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

सध्या, फिटमेंट फॅक्टरच्या 2.57 पट आणि मूळ वेतन 18000 रुपये, इतर भत्ते वगळून, रु. 18,000 X 2.57 = रु. 46260. परंतु जर ते 3.68 पर्यंत वाढवले ​​तर इतर भत्ते वगळून कर्मचाऱ्यांचे वेतन 26000 X 3.68 = 95680 रुपये होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT