Gold Silver Today Price: अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव पुन्हा वाढल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. यामुळे सोमवारी (13 ऑक्टोबर) राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. सोन्याचा दर तब्बल 1950 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 127950 या नव्या शिखरावर पोहोचला. 99.9% शुद्ध सोन्याचा दर शुक्रवारी 126000 प्रति 10 ग्रॅम होता. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत जवळपास 2 टक्क्यांनी वाढ झाली आणि हाजिर सोन्याचा दर प्रति औंस 4084 डॉलर या नवीन उच्चांकावर पोहोचला.
सोनेच नाही तर चांदीच्या दरातही सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. चांदीचा दर एकाच दिवसात 7500 ने वाढून प्रति किलोग्रॅम 1 7900 या नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला. शुक्रवारी चांदीचा दर 171500 प्रति किलोग्रॅम होता. विदेशी बाजारात हाजिर चांदीचा दर जवळपास 3 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 51.74 डॉलर या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, "सोन्याचा दर अभूतपूर्व स्तरावर पोहोचला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी आणि पुरवठ्याची व तरलता (Liquidity) यांची संरचनात्मक कमतरता आहे."
परमार यांनी पुढे स्पष्ट केले की, वाढती गुंतवणूक, जागतिक भू-राजकीय तणाव आणि केंद्रीय बँकांनी सुरु ठेवलेली सोन्याची खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सध्याची तेजी गुंतवणूक कल आणि हंगामी खरेदी चक्रामुळे आणखी वाढू शकते, असा व्यापाऱ्यांचा विश्वास आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनच्या नवीन निर्यात नियंत्रणांना उत्तर म्हणून 1 नोव्हेंबरपासून चिनी उत्पादनांवर 100 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी दिली होती. यामुळे बाजारात तणाव वाढला होता. याव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्ह या महिन्यात आणि डिसेंबरमध्ये व्याजदरात 25 आधार अंकांची कपात करण्याची शक्यता आहे. या अपेक्षेमुळे आणि लंडनमध्ये चांदीच्या पुरवठ्यात असलेल्या कमतरतेमुळे चांदीच्या दराला मोठी चालना मिळाली, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.