Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

Gold Latest Price: दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सोमवारी (6 ऑक्टोबर) ऐतिहासिक (All Time High) वाढ नोंदवली गेली.
Gold Price Hike
Gold PriceDainiK Gomantak
Published on
Updated on

Gold Latest Price: दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत सोमवारी (6 ऑक्टोबर) ऐतिहासिक (All Time High) वाढ नोंदवली गेली. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळलेला कल आणि रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली. बाजारात सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 9,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ झाली असून सोन्याचा दर 1,30,300 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला. याचाच अर्थ, आता 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 1 लाख 30 हजार रुपयांहून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

सोन्याच्या दरवाढीची प्रमुख कारणे

बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सट्टेबाजांनी (Speculators) मोठ्या प्रमाणात नवीन सौदे केले. यामुळे वायदा बाजारात सोन्याच्या किमती 1.20 लाख प्रति 10 ग्रॅमच्या वर गेल्या. दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या किमती वाढण्याची जागतिक कारणेही आहेत.

Gold Price Hike
Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

फेडरल रिझर्व्ह बँक व्याज दरात आणखी कपात करेल, या अंदाजामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली. तसेच, जागतिक पातळीवरील वाढता व्यापार आणि भू-राजकीय तणाव यामुळेही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

MCX वर दर विक्रमी स्तरावर

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली. डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याचा वायदा भाव 1,962 रुपयांनी (.166 टक्क्यांनी) वाढून 1,20,075 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. फेब्रुवारी 2026 मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या किमतीत 2,017 रुपयांची (1.69 टक्क्यांची) वाढ होऊन ते 1,21,350 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील आठवड्यातही सोन्याच्या किमतीत 3,222 रुपये प्रति 10 ग्रॅमची (2.8 टक्क्यांची) मोठी वाढ नोंदवण्यात आली.

Gold Price Hike
Gold price in India: नवा उच्चांक! सोन्याचे भाव भिडले गगनाला, चांदीही तेजीत; ताजे दर जाणून घ्या..

चांदीच्या किमतीतही विक्रमी तेजी

दुसरीकडे, सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीच्या वायदा अनुबंधांची किंमत 2,233 रुपयांनी (1.53 टक्क्यांनी) वाढून 1,47,977 रुपये प्रति किलोग्रॅमच्या नवीन उच्चांकावर पोहोचली. मार्च 2026 मध्ये डिलिव्हरी होणाऱ्या चांदीची किंमत 2,337 रुपयांनी (1.59 टक्क्यांनी) वाढून 1,49,605 रुपये प्रति किलोग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. जागतिक स्तरावर डिसेंबरमध्ये सोन्याचा वायदा भाव 2 टक्क्यांनी वाढून 3,973.60 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 1 टक्क्यांहून अधिक वाढून 48.58 डॉलर प्रति औंसच्या विक्रमी स्तरावर राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com