Gold Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Rate: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर, पहिल्यांदाच गाठला 83,000 चा टप्पा

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे शुक्रवारी (24 जानेवारी) राष्ट्रीय राजधानीत (दिल्ली) सोन्याच्या दरात सलग आठव्या सत्रात तेजी पाहायला मिळाली.

Manish Jadhav

Gold Rate: सोन्याने पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅम 83,000 चा टप्पा गाठला. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे शुक्रवारी (24 जानेवारी) राष्ट्रीय राजधानीत (दिल्ली) सोन्याच्या दरात सलग आठव्या सत्रात तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 200 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 83,100 या नव्या उच्चाकांवर पोहोचला. गुरुवारी (23 जानेवारी) प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 82,900 एवढा होता. मात्र, शुक्रवारी सोन्याच्या भावात वाढ झाली, स्थानिक बाजारात सोन्याने नवा उच्चांक गाठला," असे एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.

गांधी यांनी सांगितले की, सोन्यातील सध्याची तेजी ही अमेरिकेच्या संभाव्य टॅरिफ योजना आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर धोरणांभोवती असलेल्या अनिश्चिततेमुळे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याचा भावही 200 रुपयांनी वाढून 82,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. दुसरीकडे, शुक्रवारी चांदीच्या भावातही तब्बल 500 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चांदी 94,000 रुपये प्रति किलो झाली. गेल्या सत्रात 93,500 रुपये प्रति किलो चांदीचा भाव होता.

एमसीएक्सवर, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार 334 रुपये किंवा 0.42 टक्क्यांनी वाढून 79,960 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिवसाच्या सुरुवातीला हाच भाव 424 रुपये किंवा 0.53 टक्क्यांनी वाढून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.

ट्रम्प यांचे व्यापार धोरणे आणि टॅरिफ प्लॅनमुळे बाजारात अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. एमसीएक्समधील किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचत आहेत, असे अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजच्या संशोधन विश्लेषक-कमोडिटीज देवेया गगलानी यांनी सांगितले.

30 ऑक्टोबर 2024 रोजी फ्युचर्स इंडेक्सवरील सोन्याचा भाव 80,282 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव 835 रुपये किंवा 0.92 टक्क्यांनी वाढून 91,984 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स सोन्याचा वायदा भाव प्रति औंस 15.50 डॉलर्स किंवा 0.56 टक्क्यांनी वाढून 2,780.50 डॉलर्स प्रति औंस झाला. आशियाई बाजारात कॉमेक्स चांदीचा वायदा 1.53 टक्क्यांनी वाढून 31.32 डॉलर प्रति औंस झाला.

कोटक सिक्युरिटीजचे एव्हीपी-कमोडिटी रिसर्च कायनात चैनवाला यांनी सांगितले की, प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमधील आर्थिक घडामोडींच्या सुरुवातीच्या संकेतांसाठी गुंतवणूकदारांनी फ्लॅश पीएमआयवर तसेच अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल अधिक माहितीसाठी अमेरिकेतील हाऊसिंग डेटावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांच्या मते, गुंतवणूकदारांना आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयाचीही उत्सुकता असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT