Gold  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Price: विक्रमी उच्चांकानंतर सोनं झालं स्वस्त, भावात मोठी घसरण!

Gold Price Today: तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे.

Manish Jadhav

Gold Price Today, 21 March 2023: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे.

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. काल सोन्याने बाजारात सार्वकालिक उच्चांक नोंदवला होता, त्यानंतर सोन्याच्या दराने 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी ओलांडली होती, मात्र आज सततच्या वाढीनंतर सोने स्वस्त झाले आहे. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे ते पाहूया-

सोन्याची किंमत काय होती

मंगळवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा (Gold) भाव 470 रुपयांनी घसरुन 59,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. त्याचवेळी, गेल्या व्यापार सत्रात सोने 59,950 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.

चांदीही स्वस्त झाली

याशिवाय, चांदीचा (Silver) भावही 420 रुपयांनी घसरुन 68,550 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

जाणून घ्या तज्ज्ञांचे मत काय आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,967 डॉलर प्रति औंसवर घसरला, तर चांदी 22.39 डॉलर प्रति औंसवर घसरली. गांधी म्हणाले की, आता गुंतवणूकदारांच्या नजरा अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक व्याजदराच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. बुधवारी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल लागणार आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरु शकता. 'बीआयएस केअर अॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की, नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT