Gold Price: सोन्याने रचला नवा रेकॉर्ड, 10 ग्रॅमची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Gold Price Today, 20 March 2023: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुमचाही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर आज सोन्याने नवा रेकॉर्ड केला आहे.
Gold - Silver Price
Gold - Silver Price Dainik Gomantak

Gold Price Today, 20 March 2023: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुमचाही सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर आज सोन्याने नवा रेकॉर्ड केला आहे.

सध्या जगभरातील बँकिंग व्यवस्थेची बिकट अवस्था आणि शेअर बाजारातील घसरणीच्या काळात सोने सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याने 60,000 चा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या दरात आज मोठी झेप पाहायला मिळत आहे. यासोबतच चांदीही प्रतिकिलो 70,000 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.

सोन्याने 60,000 पार केले

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 1.73 टक्क्यांच्या वाढीसह 60413 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. यासोबतच भारतीय सराफा बाजारात सोन्याचा भाव 58220 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला.

Gold - Silver Price
Gold-Silver Price : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घट

चांदीही महागली

याशिवाय, आज चांदीचा भावही तेजीत आहे. आज चांदीचा (Silver) भाव 1.24 टक्क्यांच्या वाढीसह 69353 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारपेठेतही दर वाढले आहेत

जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचे झाल्यास, सोन्या-चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. कोमॅक्सवर सोने 1990 डॉलर प्रति औंस आणि चांदी 22.58 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

Gold - Silver Price
Gold Jewellery Bill Of 1959: 1959 मध्ये एवढ्या रुपयांत मिळत होते10 ग्रॅम सोने, 63 वर्षांपूर्वीच्या...

सोने खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

तुम्हीही बाजारात सोने (Gold) खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अ‍ॅप देखील वापरु शकता. 'बीआयएस केअर अ‍ॅप'द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की, नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करु शकता.

दर तपासा

तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com