Gold Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Rate: सोन्याच्या किमतीचा नवा रेकॉर्ड! 88 हजारांचा टप्पा ओलांडला, एका दिवसात 2,430 रुपयांची वाढ

Gold Price Record High India: सोमवारी (10 फेब्रुवारी) राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 2,430 रुपयांनी वाढून 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचला.

Manish Jadhav

Gold Price Record High India: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. यातच, सोन्याने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. सोमवारी (10 फेब्रुवारी) राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव 2,430 रुपयांनी वाढून 88,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे किमती वाढल्या, असे पीटीआयने वृत्त दिले. 99.9 टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूचा भाव गेल्या आठवड्यात 86,070 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. स्थानिक बाजारात 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 2,430 रुपयांनी वाढून 88,100 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तर चांदीचा भाव 1,000 रुपयांनी वाढून 97,500 रुपये प्रति किलो झाला.

जागतिक धोरणांचा परिणाम

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, जागतिक ट्रेंड आणि कमकुवत रुपयामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या (Gold) किमतीत मोठी वाढ झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व स्टील आणि ॲल्युमिनियमवर 25 टक्के नवीन कर लादण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक स्तरावर स्पॉट मार्केटमध्ये या मौल्यवान धातूच्या किमतीने प्रति औंस 2,900 डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला.

वायदा बाजारातही सोन्याच्या किमतीचा विक्रम

एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार 940 रुपयांनी वाढून 85,852 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचले. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती वाढत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च- ॲनालिस्ट-कमोडिटी अँड करन्सीचे जतिन त्रिवेदी यांनी सांगितले. जागतिक आर्थिक अनिश्चिततेमध्ये गुंतवणूकदार (Investors) सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जून डिलिव्हरीसाठीचा करार 1,015 रुपये किंवा 1.18 टक्क्यांनी वाढून 86,636 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन उच्चांकावर पोहोचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव 632 रुपयांनी वाढून 95,965 रुपये प्रति किलो झाला. जागतिक स्तरावर, कॉमेक्स सोन्याचा वायदा भाव प्रति औंस 45.09 डॉलर्स किंवा 1.56 टक्क्यांनी वाढून 2,932 डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik’s Asthi Visarjan: खांडेपार नदीत दिवंगत रवी नाईक यांच्या अस्थींचे विसर्जन

Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

Donald Trump Oil Claim: 'भारत रशियाकडून तेलाची खरेदी थांबवणार'! ट्रम्प यांच्या नवा दाव्यामुळे चर्चेला उधाण

वाळूमाफियांना बसणार चाप! जनतेसाठी हेल्पलाईन जाहीर; तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक जाणून घ्या..

Horoscope: बुधादित्य योग! 'या' राशींना होणार मोठा फायदा; धन प्राप्तीसाठी उत्तम वेळ

SCROLL FOR NEXT