Gold Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Price: बजेटपूर्वीच सोन्याने केला मोठा धमाका, किंमतीचा नवा रेकॉर्ड; 85,000 चा गाठला टप्पा

Gold Price In Delhi Today: देशाची राजधानी दिल्ली असो किंवा मल्टी कमोडिटी एक्सचेंज, सर्वत्र सोन्याची तेजी पाहायला मिळत आहे. दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

Manish Jadhav

Gold Price In Delhi Today: देशाची राजधानी दिल्ली असो किंवा मल्टी कमोडिटी एक्सचेंज, सर्वत्र सोन्याची तेजी पाहायला मिळत आहे. दोन्ही ठिकाणी सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. बजेटच्या एक दिवस आधी दिल्लीत सोन्याच्या किमतीत 1100 रुपयांची वाढ झाली आहे. तर एमसीएक्सच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याने 82,400 रुपयांची पातळी ओलांडून एक नवा रेकॉर्ड केला. सोन्याच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे टॅरिफ धोरण आणि फेडने व्याजदर दीर्घकाळ रोखून ठेवण्याचा घेतलेला निर्णय. ज्यामुळे अमेरिकन बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.

राजधानी दिल्लीत सोन्याने नवा रेकॉर्ड नोंदवला

दरम्यान, शुक्रवारी (31 जानेवारी) देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 84,900 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी पातळीवर पोहोचला. 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किमतीत सलग तिसऱ्या सत्रात वाढ पाहायला मिळाली आहे. 1 जानेवारी रोजी स्थानिक बाजारात सोन्याचा भाव 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तेव्हापासून त्यात 5,510 रुपये किंवा सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 1100 रुपयांनी वाढून 84,500 रुपये प्रति 10 ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला, जो मागील सोन्याचा भाव 83,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी चांदीचा भाव 850 रुपयांनी वाढून 95,000 रुपये प्रति किलोवर पोहोचला. गुरुवारी चांदीचा दर 94,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

एमसीएक्सवर सोने विक्रमी पातळीवर

दुसरीकडे, देशाच्या फ्युचर्स मार्केट मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होत असल्याचे दिसून आले. एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव संध्याकाळी 7 वाजता 226 रुपयांच्या वाढीसह 82,270 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर व्यवहार सत्रादरम्यान सोन्याचा भाव 82,415 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. तर आज सोन्याचा भाव 82,199 रुपयांवर ओपन झाला. दुसरीकडे, मार्च फ्युचर्स चांदीचा भाव 536 रुपयांच्या वाढीसह 93,982 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. तर चांदीचा भाव व्यापार सत्रादरम्यान 94,125 रुपयांवर पोहोचला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT