Gold Price Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Price: ऐतिहासिक दरवाढ! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याने केला मोठा धमाका, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 130000 लाखांच्या पार

Today Gold Price: किरकोळ विक्रेते आणि ज्वेलर्संनी धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या जोरदार खरेदीमुळे सोन्याच्या दराने दिल्लीत पहिल्यांदाच 1.3 लाख प्रति 10 ग्रॅम चा टप्पा ओलांडला.

Manish Jadhav

Gold Price Hike: सोने आणि चांदीच्या दरातील वाढ काही केल्या थांबायला तयार नाहीये. धनत्रयोदशीपूर्वी मंगळवारी (14 ऑक्टोबर) भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा इतिहास रचला. किरकोळ विक्रेते आणि ज्वेलर्संनी धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या जोरदार खरेदीमुळे सोन्याच्या दराने दिल्लीत पहिल्यांदाच 1.3 लाख प्रति 10 ग्रॅम चा टप्पा ओलांडला.

पीटीआय वृत्तानुसार, ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमतीत एकाच दिवसात 2,850 ची जबरदस्त वाढ झाली. या वाढीमुळे सोन्याचा भाव 1,30,800 प्रति 10 ग्रॅम या विक्रमी स्तरावर पोहोचला, जो यापूर्वी 1,27,950 होता. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर देखील 2,850 ने वाढून 1,30,200 प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला.

चांदीनेही रचला नवा विक्रम

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीचा भाव तब्बल 6000 रुपयांनी वाढून 1,85,000 प्रति किलोग्राम या आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. चांदीच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली.

किंमती वाढण्याची दोन प्रमुख कारणे

व्यापाऱ्यांनी सोन्या चांदीच्या किमतीतील या वाढीसाठी खालील दोन प्रमुख कारणे दिली आहेत.

  1. सणासुदीच्या हंगामामुळे खरेदी: धनत्रयोदशी आणि लग्नसराईच्या तोंडावर ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेते मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचा स्टॉक करत आहेत, ज्यामुळे मागणी वाढली आहे.

  2. रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन: भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 12 पैशांनी घसरुन 88.80 प्रति डॉलर या आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर पोहोचला. रुपया कमकुवत झाल्याने आयात केलेल्या सोन्याची किंमत भारतीय बाजारात वाढली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती

जागतिक बाजारपेठेतही सोन्यामध्ये तेजी कायम आहे, तरीही ते आपल्या विक्रमी उच्च स्तरापासून थोडे मागे होते. स्पॉट गोल्ड 0.72 टक्क्यांनी वाढून 4,140.34 यूएस डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होते, तर त्याने दिवसाच्या सुरुवातीला 4,179.71 यूएस डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठला होता. स्पॉट सिल्व्हर मात्र 1.92 टक्क्यांनी घसरुन 51.36 यूएस डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. सध्या सुरु असलेल्या या दरवाढीमुळे सामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांमध्येही सोन्या-चांदीच्या भावांबद्दल मोठी उत्सुकता आणि चिंता वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT