Gmail
Gmail  Dainik Gomantak
अर्थविश्व

ईमेलमध्ये काय लिहायचं हे कळत नाहीये? आता चिंता मिटली, Gmail आणतंय भन्नाट फिचर

Manish Jadhav

Gmail मध्ये लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. त्यानंतर तुम्हाला मेल टाइप करण्याची गरज भासणार नाही. जीमेलच्या या नव्या फीचरला 'हेल्प मी राइट' (Help Me Write) असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर यूजर्स ईमेलचा ऑटो ड्राफ्ट करु शकतील.

दरम्यान, जीमेलमध्ये Google ओन्ड AI पॉवर्ड ऑर्टिफिशियल इंटेलिजेंस सपोर्ट प्रदान करण्यात आले आहे. हे नवीन फीचर येत्या काही महिन्यांत आणले जाऊ शकते.

दुसरीकडे, जीमेलच्या या नवीन फीचरमुळे यूजर्सचा ईमेल लिहिण्याचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. तसेच, ज्या यूजर्संना (Users) इंग्रजीमध्ये ईमेल लिहिण्यात अडचण येते, त्यांच्यासाठी हे फिचर्स उपयुक्त ठरु शकते.

तथापि, तुम्ही AI ला तुम्हाला ईमेलमध्ये काय लिहायचे आहे, हे सांगणे आवश्यक आहे. जेव्हा AI तुमच्यासाठी ईमेल तयार करेल, तेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मेल संपादित करु शकाल.

Help Me Write फीचर

Google चे "Help Me Write" फिचर्स Gmail आणि Google Docs साठी उपलब्ध करुन दिले जाऊ शकते.

हे फिचर्स वापरकर्त्याद्वारे प्रदान केलेल्या इनपुटच्या मदतीने तुमच्यासाठी ईमेलचा मसुदा तयार करेल. हे फिचर्स वर्कस्पेस अपग्रेड म्हणून दिले जाऊ शकते.

उदाहरणार्थ, जर तुम्हाला बस रद्द करण्यासाठी रिफंड हवा असेल, तर नवीन फिचर्स तुमच्या सांगण्यावरुन ईमेल ड्राफ्ट करेल.

नवीन फिचर्स काम कसे करेल

सर्व प्रथम, एक नवीन डॉक्यूमेंट तयार करावे लागेल.

हे फीचर जीमेलच्या टॉप पेजवर दिसेल. तुम्हाला या हेल्प मी राइट आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

यानंतर एक बॉक्स उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला लिहावे लागेल आणि तुम्हाला कोणता मेल लिहायचा आहे ते सांगावे लागेल.

यानंतर Create हा पर्याय निवडावा लागेल.

त्यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला Rewrite and New Choice या पर्यायावर क्लिक करावे लागेल. तसेच, ईमेलचा टोन बदलण्याचा पर्याय असेल. यानंतर तुम्ही टेस्ट रिफाइन करु शकाल.

एडिटिंग केल्यानंतर तुम्ही ईमेल इन्सर्ट करु शकाल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT