Whatsapp Spam Call: व्हॉट्सॲपने युजर्सना दिला हा इशारा; दुर्लक्ष केलात तर रिकामी होईल अकाउंट

व्हॉट्सॲपद्वारे आंतरराष्ट्रीय नंबरवरून स्पॅम कॉल
Whatsapp Fraudsters
Whatsapp FraudstersDainik Gomantak
Published on
Updated on

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनी संपूर्ण देशात आपले पाय पसरले आहेत. ही फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला जातो. तसाच एक नवा प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सॲपद्वारे आंतरराष्ट्रीय नंबरवरून स्पॅम कॉल हा एक नवीन प्रकार सायबर गुन्हेगारांनी स्वीकारला आहे.

मागील काही दिवसांपासून व्हॉट्सॲपद्वारे लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. व्हॉट्सॲपवर केवळ एका मेसेजने बँक खात्यातील रक्कम गायब होते.

Whatsapp Fraudsters
Imran Khan Arrest Case: पाकिस्तान SC चा मोठा निर्णय, इम्रान खान यांच्या सुटकेचा दिला आदेश; 'मला लाठ्या-काठ्यांनी...'

आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल हा एक नवीन मार्ग आहे जो सायबर गुन्हेगारांनी अलीकडेच स्वीकारला आहे. एका व्यक्तिला व्हॉट्सॲपवर एक मेसेज किंवा मिस्ड कॉल देऊन ते व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांला कॉल किंवा मेसेज परत करण्यास प्रवृत्त करतात. वापरकर्त्यांने मेसेज किंवा मिस्ड कॉल दिल्यास वापरकर्त्यांच्या खात्यातील रक्कम खाली केली जाते.

भारतातील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना गेल्या काही दिवसांपासून येणार्‍या आंतरराष्ट्रीय नंबरवरून स्पॅम कॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवल्यामुळे व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, त्यांनी आपल्या AI आणि ML सिस्टमध्ये त्वरीत वाढ केली आहे. वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करणे हे मेटा आणि व्हॉट्सॲपसाठी महत्वाचे आहे असे व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com