GDP growth on high in financial year 2021-22  Dainik Gomantak
अर्थविश्व

देशाच्या GDPत विक्रमी वाढ, अर्थव्यवस्था रूळावर

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची (GDP) मोठी आकडेवारी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय अर्थव्यवस्थेची (Indian Economy) गाडी पुन्हा रुळावर आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची (GDP) मोठी आकडेवारी समोर आली आहे. कोरोना संकटाच्या दरम्यान, जीडीपी आघाडीवर पहिल्यांदाच केंद्र सरकारसाठी (Central Government) चांगली बातमी आली आहे.(GDP growth on high in financial year 2021-22)

काल केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी निकाल जाहीर केला आहे. पहिल्या तिमाहीत संपूर्ण देशांतर्गत उत्पादनाचा (GDP) विकास दर विक्रमी 20.1 टक्के आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर निगेटिव्ह 23.9 टक्के होता. जीडीपी हे कोणत्याही देशाचे आर्थिक स्केल मोजण्यासाठी सर्वात अचूक उपाय आहे.

याआधी, एसबीआयच्या इकोरॅप रिसर्च अहवालात अंदाज होता की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी 18.5 टक्के दराने वाढू शकतो. त्याच वेळी, आरबीआयने एप्रिल-जून 2021 तिमाहीत 21.4 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज लावला होता. जीडीपीमध्ये तीव्र सुधारणा झाल्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

लक्षणीय म्हणजे कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये 23.9 टक्के इतकी मोठी घट झाली होती . त्यानंतर, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 7.5 टक्क्यांनी घटली, तर तिसऱ्या तिमाहीत ती 0.4%होती. तर चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च), जीडीपी वाढीचा दर 1.6 टक्के नोंदवला गेला. अशा प्रकारे, आर्थिक वर्ष 2020-21 साठी जीडीपी वाढीचा दर -7.3% टक्के इतका होता.

सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) म्हणजे एका विशिष्ट कालावधीत देशाच्या हद्दीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक किंवा बाजार मूल्य. हे देशाच्या देशांतर्गत उत्पादनाचे सर्वसमावेशक मापन आहे आणि ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्केल दर्शवते.त्याची गणना साधारणपणे दरवर्षी केली जाते, परंतु भारतात दर तीन महिन्यांनी म्हणजेच तिमाहीने गणना केली जाते. काही वर्षांपूर्वी शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि संगणक अशा विविध सेवा देखील सेवा क्षेत्रात जोडल्या गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT