Gautam Adani And Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

अंबानींना टक्कर देण्याच्या तयारीत गौतम अदानी, दूरसंचार क्षेत्रात उतरणार, 5G लिलावात होणार सहभागी!

अदानी समूह आता दूरसंचार क्षेत्रामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. या महिन्यामध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे.

दैनिक गोमन्तक

ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना थेट टक्कर देण्याच्या विचारात आहेत. अदानी समूह आता दूरसंचार क्षेत्रामध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. या महिन्यामध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे. (Gautam Adani to enter telecom sector participate in 5G auction)

अशा परिस्थितीत अदानी समूहाची थेट मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओ आणि दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांच्या एअरटेलशी स्पर्धा होऊ शकते. अत्यंत हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असलेल्या या एअरवेव्हजच्या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी 5G दूरसंचार सेवा शुक्रवारी किमान चार अर्जदारांसह बंद झाली आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै रोजी होणार आहे.

दूरसंचार क्षेत्रातील तीन खाजगी कंपन्यांनी- Jio, Airtel आणि Vodafone Idea ने अर्ज केला आहे तर चौथा अर्जदार अदानी समूह आहे. समूहाने अलीकडेच NLD आणि ILD परवाने देखील मिळवले आहेत.

26 जुलैपासून स्पेक्ट्रम लिलाव सुरू होईल

या दाव्याची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकलेली नाही. या संदर्भात अदानी समूहाला पाठवलेल्या ईमेल आणि फोन कॉल्सना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. लिलावाच्या अंतिम मुदतीनुसार अर्जदारांच्या मालकीचे तपशील 12 जुलै रोजी प्रकाशित केले जाणार आहे. टेलिकॉम स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै 2022 पासून सुरू होत आहे आणि या दरम्यान एकूण 72,097.85 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम किमान 4.3 लाख कोटी रुपयांना देऊ केले जाऊ शकते.

व्यवसायात अद्याप प्रत्यक्ष समोरासमोर नाही

अंबानी आणि अदानी हे दोघेही गुजरातचे रहिवासी आहेत आणि त्या दोघांनीही मोठे उद्योग समूह स्थापन केले आहेत. मात्र, आजपर्यंत घे दोघे कोणत्याही व्यवसायामध्ये थेट आमने-सामने आले नव्हते. अंबानींचा व्यवसाय कच्च्या तेल आणि पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार ते रिटेल क्षेत्रापर्यंत तर कोळसा, ऊर्जा वितरण आणि विमान वाहतूक क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे.

पेट्रोकेमिकल्समध्ये प्रवेश करण्यासाठी सहाय्यक कंपन्यांची निर्मिती

अदानी यांनी अलीकडच्या काही महिन्यांत पेट्रोकेमिकल व्यवसायात प्रवेश करण्यासाठी उपकंपनी तयार केली. तर दुसरीकडे, अंबानी यांनी ऊर्जा व्यवसायात अनेक अब्ज डॉलर्सच्या योजना जाहीर केल्या आहेत. अदानी समूहाची आगामी काळात जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा उत्पादक बनण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. तर यासाठी 2030 पर्यंत मुदत आहे. जर अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रामध्ये एन्ट्री घेतली तर प्रथमच मुकेश अंबानींशी थेट स्पर्धा होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT