Gautam Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Gautam Adani: श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी टॉप-20 मध्ये सामील!

Adani Share: गेल्या 10 दिवसांपासून गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली, त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते.

Manish Jadhav

Adani Share: गेल्या 10 दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली, त्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे शेअर्समध्ये ही घसरण झाली. कंपनीचे मार्केट कॅप $100 बिलियनवर घसरले होते.

विशेष म्हणजे, गौतम अदानी यांची स्वतःची संपत्ती निम्म्यावर आली. परंतु मंगळवार त्यांच्यासाठी खूप खास होता. नेटवर्थ इतक्या वेगाने वाढली की, त्यांनी एका फटक्यात सर्वकाही ठीक केले.

दरम्यान, मंगळवारी अदानींच्या बहुतांश शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 14.94% वाढून 1807.25 रुपयांवर पोहोचले. आज अदानी एंटरप्रायझेसचे शेअर 1887.20 रुपयांवर पोहोचले होते.

जेव्हा कंपनीच्या शेअरमध्ये वाढ दिसली तेव्हा गौतम अदानी यांची नेट वर्थही झपाट्याने वाढली. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. या यादीत ते 17 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर आतापर्यंत तो 22 व्या क्रमांकावर होते.

अदानींची एकूण संपत्ती $1.1 बिलियनने वाढली

अदानींची एकूण संपत्ती $1.1 बिलियनने वाढली. त्यांची नेटवर्थ $62.2 बिलियनवर पोहोचली. 14 जानेवारीला हिंडेनबर्गच्या अहवालामुळे त्यांना मोठा धक्का बसला. 127 अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह, जगातील तिसरे सर्वात श्रीमंत अदानी थेट 22 व्या क्रमांकावर पोहोचले, परंतु आता हळूहळू त्यांची स्थिती सुधारत आहे.

दुसरीकडे, हिंडेनबर्ग अहवालामुळे कंपनीचे मार्केट कॅप 50 टक्क्यांहून अधिक घसरले. रोजच्या घसरणीमुळे परिस्थिती बिकट होत चालली होती. सोमवारी थोडीशी वाढ झाली असली तरी मंगळवारी वाढ झपाट्याने झाल्याने अदानींच्या संपत्तीत 1.8 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT