Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gautam Adani Net Worth: अदानींची संपत्ती रातोरात वाढली, अब्जाधीशांच्या यादीत केलं शानदार कमबॅक; अंबानींपासून...

Manish Jadhav

Gautam Adani Net Worth: अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी पुन्हा एकदा शानदार कमबॅक करताना दिसत आहेत. काल म्हणजेच सोमवारी त्यांच्या संपत्तीत सुमारे 2.92 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, त्यानंतर ते अब्जाधीशांच्या यादीत 20 व्या क्रमांकावर पोहोचले होते. त्यांची संपत्ती आता $65.9 अब्ज एवढी झाली आहे.

अदानी 24 तासांत 18 व्या स्थानावर पोहोचले

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, अदानी यांच्या एकूण संपत्तीत अवघ्या 24 तासांत सुमारे 17,780 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, त्यानंतर ते आणखी 2 अंकानी पुढे गेले. यावेळी ते अब्जाधीशांच्या यादीत 18 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

मार्केट कॅपने 11 लाख कोटींचा टप्पा पार केला

दरम्यान, शुक्रवारी आणि सोमवारी अदानींच्या शेअर्समध्ये (Shares) जबरदस्त वाढ झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांचे मार्केट कॅप देखील वाढले आहे. 2 दिवसांच्या सततच्या वाढीनंतर अदानी समूहाच्या मार्केट कॅपने 11 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

या 2 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट

दुसरीकडे, गेल्या 24 तासांत अदानी यांनी Charles Koch 18 व्या क्रमांकावर आणि ulia Flesher Koch & Family ला 19 व्या क्रमांकावर मागे टाकले आहे. चार्ल्स कोच यांची सध्या एकूण संपत्ती $64.3 अब्ज एवढी राहिली आहे.

याशिवाय 19 व्या क्रमांकावर आलेल्या ulia Flesher Koch ची संपत्ती 64.3 अब्ज डॉलर एवढी राहिली आहे.

अंबानी-अदानी यांच्यात फारसे अंतर राहिलेले नाही

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण संपत्ती सध्या $94.6 बिलियन आहे आणि ते या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर अदानी 18 व्या क्रमांकावर आहेत. सध्या अंबानी आणि अदानी यांच्यात फारसे अंतर राहिलेले नाही. सध्या दोन्ही अब्जाधीशांच्या यादीत सुमारे 28.7 अब्ज डॉलर्सचा फरक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: गोव्यातील धक्कादायक प्रकार! एका भावाकडून दुसऱ्या भावाच्या होणाऱ्या बायकोचा लैंगिक छळ

Mhadei Water Dispute: ‘म्‍हादई’च्‍या मुद्यावरून काँग्रेस व भाजपमध्‍ये 'तू तू - मैं मैं'

Rarest Birds in World: जगातील 'हे' दुर्मिळ पक्षी नामशेष होण्याच्या वाटेवर; जाणून घ्या

२१ कुटुंबे नव्या घरात करणार गणरायाचे स्वागत! राणे दाम्पत्यामुळे गणेशोत्सव ठरणार खास

भारतीयांना दिवसाला प्राप्त होतात 12 फसवे मेसेज; आतापर्यंत 93,000 हून अधिक टेलिकॉम स्कॅम!

SCROLL FOR NEXT