Fuel Pump Dainik Gomantak
अर्थविश्व

Fuel Prices: पुढच्या महिन्यात Petrol दर कमी होण्याची शक्यता

Petrolच्या सध्याच्या दरांचा विचार केल्यास देशातील 17 राज्यांत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

पुढील काहीदिवसांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर कमी होण्याची शक्यता आहे. ओपेक प्लस (Opec Plus) देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संकटानंतर आता जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे तेलाची मागणी वाढली आहे. (Fuel rates likely to fall next month)

परंतु तरी देखील यामध्ये उत्पादनाची मर्यादा असल्याने सध्या अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अडीच वर्षांच्या तुलनेत सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाचा क्लोजिंग दर 73.14 डॉलर प्रती बॅलर होता. तर जुलैमध्ये हा दर 78 डॉलरपर्यंत पोहोचला. मागच्या काही महिन्यात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढ होत होती, मात्र या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळाले आहे.

ओपेक देशांदरम्यान झालेल्या बैठकीत रशियासारख्या इतर देशांनी सुद्धा सहभाग घेतला होता. मागील वर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रोज 10 मिलियन बॅरल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आजच्या बैठकीत ओपेक प्लस देशांनी दर महिन्याला रोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्यात येणार आहे.

पेट्रोलच्या सध्याच्या दरांचा विचार केल्यास देशातील 17 राज्यांत पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, राजस्थान, केरळ, लडाख, जम्मू-काश्मीर, ओडिशा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, पुदुच्चेरी आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे डिझेलच्या दरात 5 वेळा तर पेट्रोलच्या दरात तब्बल 9 वेळा वाढ झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa POCSO Case: पॉक्सो, बलात्कार प्रकरणातील 10 वर्षांच्या शिक्षेला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाची गोवा सरकारला नोटीस

Teacher Transfer Protest: 'आम्हाला हे शिक्षक यावर्षी तरी हवेत'; पेडणेतील विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार, जोरदार निदर्शने

Volkswagen Layoffs: मेड इन चायनाचा दणका! फॉक्सवॅगन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार नारळ; ऑटोमोबाईल जगतात इतिहासातील सर्वात मोठी कपात

Post Office Recruitment 2026: 10वी पास तरुणांसाठी खूशखबर! पोस्ट ऑफिसमध्ये 130 पदांवर भरती; अर्ज कुठे करावा? अर्जाची अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व

Saptakoteshwar Temple: गोव्याच्या अधिदैवताचे मूळ स्थानी पुनर्स्थापन? श्री सप्तकोटेश्वर-कोटीतीर्थाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात

SCROLL FOR NEXT