Petrol Pump Dainik Gomantak
अर्थविश्व

Fuel Price: मोठी खूशखबर, तेलाच्या किमतीत मोठी घसरण; जाणून घ्या नव्या किमती

Diesel Price: गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

दैनिक गोमन्तक

Petrol Price: गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, आता तेलाच्या किमतीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती घसरत होत्या आणि आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती जानेवारीनंतर प्रथमच प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली आल्या आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.

मागणीत घट

वास्तविक, जगात मंदीची भीती आहे. संभाव्य जागतिक मंदीमुळे इंधनाची (Fuel) मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे तेलाच्या किमती सोमवारी दुसऱ्या दिवशी घसरल्या.

तेलाच्या किमती

नोव्हेंबर सेटलमेंटसाठी ब्रेंट क्रूड फ्युचर्स $1.35, किंवा 1.57%, प्रति बॅरल $84.80 वर घसरले. करार $84.51 पर्यंत घसरला, 14 जानेवारीनंतरचा सर्वात कमी स्तर आहे. दुसरीकडे, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) नोव्हेंबर डिलिव्हरीसाठी क्रूड फ्युचर्स $1.15 किंवा 1.46% ने घसरुन $77.59 प्रति बॅरलवर आले. WTI $77.21 पर्यंत घसरला, 6 जानेवारी नंतरची सर्वात कमी स्तर आहे. त्याच वेळी, शुक्रवारी दोन्ही करार सुमारे 5% घसरले.

याशिवाय, सोमवारी डॉलर निर्देशांकाने 20 वर्षांचा उच्चांक गाठला. तर दुसरीकडे, रुपयामध्ये आणखी घसरण झाली आहे. सोमवारी एका डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाने 81.76 रुपयांची पातळी गाठली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT