Economy Dainik Gomantak
अर्थविश्व

आजपासून बदलण्यात येणार हे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

1 मार्च 2022 पासून अर्थिक व्यहारातील अनेक नियम बदलतील. महागाईचा फटका तुम्हालाही बसू शकतो.

दैनिक गोमन्तक

1 मार्च 2022: आज महा शिवरात्री आहे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून अनेक नियम बदलणार आहेत. आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. बँक आणि एलपीजी सिलिंडरशी संबंधित नियमांव्यतिरिक्त जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची ही एक महत्त्वाची तारीख आहे. जाणुन घ्या की कोणते बदल होणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागु शकते. (From today many of the rules in financial transactions will change)

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख

28 फेब्रुवारी ही पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच, जर जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर तुमचे पेन्शन थांबेल. सर्व पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन (Pension) मिळणे सुरू ठेवण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख दरवर्षी ३० नोव्हेंबर असते, परंतु सरकारी निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा देत, या वर्षी ही तारीख दोनदा वाढवण्यात आली.

IPPB शुल्क वाढेल

1 मार्च 2022 पासून बँकेतून (Bank) पैसे जमा आणि काढण्यावरील शुल्काशी संबंधित नियमही बदलत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच IPPB ने शुल्क घेणे सुरू केले आहे. जर तुम्ही IPPB चे डिजिटल बचत खाते बंद करणार असाल तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. डिजिटल बचत खाते बंद करण्यासाठी IPPB तुमच्याकडून 150 रुपये आकारेल. यासोबतच तुम्हाला या 150 रुपयांवर जीएसटी भरावा लागेल. तथापि, हा नियम 1 मार्चपासून नाही तर 5 मार्च 2022 पासून लागू होईल.

एलपीजी सिलिंडरची किंमत निश्चित केली जाईल

एलपीजी सिलिंडरची (LPG Cylender) किंमत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केली जाते. त्यामुळेच सर्वांच्या नजरा 1 मार्चकडे लागल्या आहेत, कारण तेल कंपन्यांनी एलपीजीच्या किमती वाढवल्या तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार आहे. त्यांचे बजेट गडबड होऊ शकते. मात्र, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT