Ration Shop
Ration Shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration: सरकारने केली मोठी घोषणा ! मोफत राशन घेणाऱ्यांना होणार फायदा

दैनिक गोमन्तक

Free Ration Scheme Update: केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत तुम्हीही मोफत राशन घेतले असेल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. यापुढे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मोफत राशन तसेच मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.

सरकार मोहीम राबवत आहे

सरकारने (Government) निर्णय घेतला आहे की, सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जाईल. त्यासाठी व्यापक मोहीम राबवली जात आहे.

अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध

सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे, ज्यामध्ये तुम्ही राशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करु शकता. योगी सरकारने अंत्योदय कार्डधारकांचे आयुष्मान कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हास्तरावर ही मोहीम राबविण्यात येत आहे.

मोफत उपचार मिळेल

सरकारच्या या निर्णयानंतर तुम्हाला तुमच्या उपचारासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. यावेळी सरकारकडून नवीन आयुष्मान कार्ड बनवले जात नसून ज्यांची नावे यादीत आहेत, त्यांची कार्डे बनवली जात आहेत.

सप्टेंबर महिन्यातही सरकार मोफत राशन देत आहे

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मोफत राशन योजनेचा सहावा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरु झाला आहे. गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतलेले 15 कोटी लाभार्थी आहेत, ज्यांना सरकारकडून मोफत राशन सुविधा दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

Covaxin Side Effect: कोविशील्डनंतर Covaxin वादाच्या भोवऱ्यात; अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासातून उघड

Goa Today's Live News: देवसा येथे घरफोडी; 1.65 लाखांचा मुद्देमाल लंपास

Water Shortage : तयडे गावाला टँकरची प्रतीक्षा; सुर्ला, बाराभूमी, बोळकर्णेला किंचित दिलासा

SCROLL FOR NEXT