Air Asia Free Ticket Offer: आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करण्याची संधी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. जर तुमचीही ही इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी बातमी देणार आहोत, जी वाचून तुम्ही पैसे खर्च न करता हे स्वप्न पूर्ण करु शकाल. खरं तर, Air Asia या विमान कंपनीने अशी जबरदस्त ऑफर आणली आहे, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला खूप आनंद होईल.
50 लाख मोफत सीट ऑफर
एअर एशिया कंपनी या खास ऑफर अंतर्गत लोकांना 50 लाख जागांसाठी मोफत तिकिटे देणार आहे. यासाठी 19 सप्टेंबरपासून विक्री सुरु झाली असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. जर तुम्ही या ऑफरमध्ये मोफत तिकीट बुक केले तर तुम्ही पुढील वर्षी 1 जानेवारी 2023 ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रवास करु शकाल.
देश-विदेशात फिरता येईल
या ऑफर अंतर्गत तुम्हाला अनेक शहरांमध्ये जाण्याची सुविधा मिळेल. काही आंतरराष्ट्रीय मार्गांसाठीही तुम्हाला मोफत तिकिटे मिळू शकतात. यामध्ये बँकॉक (Bangkok), क्राबी, फुकेत, न्हा ट्रांग, लुआंग प्राबांग, नाकोर्न, नाकोर्न श्रीथामत, मंडाले, नोम पेन्ह आणि पेनांग या थायलंड (Thailand) शहरांचा समावेश आहे.
अशा प्रकारे सीट बुकिंग करा
जर तुम्हाला एअर एशियाच्या 50 लाख मोफत सीट ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कंपनीच्या अॅपवर जाऊन सीट बुक करु शकता. यासोबतच तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन 'फ्लाइट्स' आयकॉनवर क्लिक करुन तुमच्या पसंतीच्या शहरासाठी सीट बुक करु शकता. मात्र, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, तुम्ही हे मोफत तिकीट इतर कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करु शकत नाही. त्याचवेळी, ते सर्व परिस्थितीत विहित कालावधीत वापरावे लागेल.
दुसरीकडे, कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळात एअर एशिया कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. आता परिस्थिती सुधारत असताना पुन्हा जुना दर्जा मिळावा यासाठी कंपनीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी 50 लाख जागांची फ्री सीट कॅम्पेन (Air Asia Free Ticket Offer) सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे लोक एअर एशिया एअरलाइनकडे वळत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.