LPG Gas Cylinder Subsidy : एक काळ असा होता जेव्हा महिलांना अन्न शिजवण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत करावी लागत होती. मात्र आता बदलत्या काळानुसार एलपीजी सिलिंडर घरोघरी पोहोचला आहे.
पण, गॅसच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार जनतेला स्वस्त गॅस सिलिंडरसाठी सबसिडी देऊ करत आहे. देशातील मोठी लोकसंख्या गॅस सिलिंडरवर अवलंबून आहे. या अनुदानातून लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो. एलपीजी सिलिंडरसाठी सबसिडी घेण्याचा मार्ग जाणून घेऊ.
सबसिडी मिळवण्यासाठी करा हे काम
केंद्र सरकार गॅस सिलिंडरची सबसिडी थेट खातेदारांच्या खात्यात हस्तांतरित करते. गॅस सिलिंडरची सबसिडी मिळवण्यासाठी तुमच्या खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शन आधारशी लिंक करण्यासाठी तुमच्याकडे ऑनलाईन व्यवस्था आहे.
अशा प्रकारे आधारशी ऑनलाईन गॅस कनेक्शन लिंक करा :
प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाईट UIDAI.gov.in वर क्लिक करा.
आधारशी संबंधित माहितीसाठी विचारलेली माहिती भरा.
तुमचे नाव, जिल्हा आणि राज्य प्रविष्ट करा.
त्यानंतर LPG विभाग भरा.
इंडेन गॅस कनेक्शनसाठी IOCL, भारत गॅस कनेक्शनसाठी BPCL भरा.
गॅस कनेक्शनमध्ये ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
पुढे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
त्यानंतर सबमिट करा.
OTP टाका.
नंतर सुरक्षा मजकूर भरा.
सबमिट पर्यायावर क्लिक करा.
तुमचे गॅस कनेक्शन आधारशी लिंक केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.