FMCG Products Price Hike 
अर्थविश्व

Price Hike: महागाईचा मार! शॅम्पू, टूथपेस्टपासून शीतपेयांपर्यंत 'या' उत्पादनांच्या किमती वाढणार

FMCG उत्पादने म्हणजे अशी उत्पादने जी लोक दररोज वापरतात. साबण, शैम्पू, टूथपेस्ट, टूथब्रशपासून ते प्रक्रिया केलेले अन्न आणि शीतपेयांपर्यंत सर्व काही FMCG उत्पादने मानले जाते.

Ashutosh Masgaunde

FMCG companies may increase product prices by up to three percent this year, this may increase the prices of shampoo, toothpaste, bread, butter, honey to spices:

एफएमसीजी कंपन्या या वर्षी उत्पादनांच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. त्यामुळे शॅम्पू, टूथपेस्ट, ब्रेड, बटरपासून मध ते मसाल्यांपर्यंतच्या विविध उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.

गेल्या वर्षी कच्च्या मालाच्या किमती घसरल्याने या कंपन्यांनी दर कमी केले होते, मात्र यंदा कच्च्या मालाचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत कंपन्या आता किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.

फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) कंपन्यांचे म्हणणे आहे की, उत्पादनांच्या किमती वाढल्याने त्यांच्या मार्जिनवर सकारात्मक परिणाम होईल.

गोदरेज कंझ्युमर, डाबर आणि इमामी सारख्या कंपन्यांनी सांगितले की, किमती वाढल्याने मूल्य-अधारित किमतीत वाढ होईल.

डाबरने सांगितले की, त्यांनी खाद्यपदार्थांच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

इमामी यावर्षी किमतीत सुमारे तीन टक्क्यांनी वाढ करू शकते. गोदरेज कंझ्युमरच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वस्तूंच्या किमती आता किंचित जास्त आहेत.

अहवालानुसार, FMCG कंपन्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती कमी केल्या कारण इनपुट सामग्रीच्या किमतीत घट झाली होती, ज्याचा परिणाम FMCG उद्योगाच्या मूल्य वाढीच्या दरावर झाला. वाढत्या किमतींमुळे यंदाही वाढीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे.

FMCG उत्पादने म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स ही अशी उत्पादने आहेत जी लोक दररोज वापरतात. साबण, शैम्पू, टूथपेस्ट, टूथब्रशपासून ते प्रक्रिया केलेले अन्न आणि शीतपेयांपर्यंत सर्व काही FMCG उत्पादने मानले जाते. त्यांच्या किंमती वाढल्याने प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो आणि प्रत्येक घराचे बजेट बिघडते, कारण आज जवळजवळ प्रत्येकजणाला या वस्तू वापरणे अणिवार्य असते.

भारतातील महागाईबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात त्यात काही प्रमाणात घट दिसून आली. किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 5.1 टक्क्यांवर घसरला, जो तीन महिन्यांतील सर्वात कमी आहे. मात्र, तो अजूनही रिझर्व्ह बँकेच्या 4 टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एमपीसीच्या बैठकीतही रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. रिझर्व्ह बँक अजूनही महागाईच्या आव्हानांना तोंड देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Kadamba Protest: EV बस 2 कोटीची, पगार मात्र 600 रुपये! कदंब चालक मागण्यांसाठी आक्रमक; संपाचा दिला इशारा

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

SCROLL FOR NEXT