Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

FM Nirmala Sitharaman: बँकांबाबत अर्थमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, संसदेत दिली 'ही' माहिती

दैनिक गोमन्तक

FM Nirmala Sitharaman: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बँकांबाबत अनेक प्रकारचे नियम बनवले जातात, जेणेकरुन देशाची बँकिंग व्यवस्था सुधारता येईल आणि एनपीए कमी होऊ शकेल. दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत मोठी माहिती दिली आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत बँकांनी 10,09,511 कोटी रुपयांची बुडीत कर्जे (एनपीए) राइट ऑफ केल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

काय घेतला निर्णय?

अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, 'अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) किंवा बुडीत कर्जे राइट ऑफ करुन संबंधित बँकेच्या (Bank) खतावणीमधून काढून टाकण्यात आली आहेत. यामध्ये अडकलेल्या कर्जांचाही समावेश आहे, ज्याच्या बदल्यात चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तरतूद करण्यात आली आहे.'

रिझर्व्ह बँकेने माहिती दिली

RBI कडून मिळालेल्या माहितीनुसार, शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी (SCBs) गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये 10,09,511 कोटी रुपयांची रक्कम राइट ऑफ केली आहे. कर्जमाफी करुन कर्जदाराला फायदा होणार नाही, तो परतफेडीसाठी जबाबदार राहील आणि थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

किती कोटी वसूल झाले?

त्या पुढे म्हणाल्या की, शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी गेल्या पाच आर्थिक वर्षांत एकूण 6,59,596 कोटी रुपये वसूल केले आहेत. यात 1,32,036 कोटी रुपयांच्या वसुलीचा समावेश आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi News : वैश्य समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक

Bicholim Factory Explosion : कारखाना मालकाला अटक करा; स्फोट प्रकरणी स्थानिकांत संताप

Bardez Water Shortage : बार्देशवासीयांच्या पाचवीला पूजलेलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य; टॅंकरवरच भिस्त

Goa Public Service Commission: सरकारी नोकरीची संधी, गोवा लोकसेवा आयोगामार्फत 24 पदांची भरती

Uttar Pradesh Crime: ‘’आधी बायकोची हातोड्याने हत्या नंतर आईवर गोळी झाडली, अन्...’’; उत्तर प्रदेशातील मन सुन्न करणारी घटना

SCROLL FOR NEXT