Nirmala Sitharaman ON NPA: बुडीत कर्ज म्हणजेच एनपीए कमी करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम आता दिसून येत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सीतारामन म्हणाल्या की, 'चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांचा निव्वळ नफा एकत्रितपणे 50 टक्क्यांनी वाढून 25,685 कोटी रुपये झाला आहे. 2022-23 च्या पहिल्या सहामाहीत सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा 32 टक्क्यांनी वाढून 40,991 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.'
सरकारच्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत आहेत
सीतारामन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'NPA कमी करण्यासाठी आणि PSBs ची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा परिणाम दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 12 सरकारी बँकांचा (Bank) निव्वळ नफा वाढून 25,685 कोटी रुपये आणि पहिल्या सहामाहीत 40,991 कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर अनुक्रमे 50 टक्के आणि 31.6 टक्के वाढ झाली आहे.'
UCO बँकेचा निव्वळ नफा 504 कोटींवर पोहोचला
अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'कॅनरा बँकेचा (Canara Bank) निव्वळ नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 89 टक्क्यांनी वाढून 2,525 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.' दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 'कोलकाता-आधारित UCO बँकेचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत 145 टक्क्यांनी वाढून 504 कोटी रुपये झाला आहे. बँक ऑफ बडोदाचा (Bank Of Baroda) निव्वळ नफा समीक्षाधीन तिमाहीत 58.70 टक्क्यांनी वाढून 3,312.42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.'
तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडिया (BOI) च्या नफ्यात 9 ते 63 टक्क्यांची घट झाली आहे. बुडीत कर्जासाठी जास्त तरतूद केल्यामुळे या बँकांचा नफा कमी झाला आहे. त्याच वेळी, इतर 10 बँकांच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत 13 ते 145 टक्क्यांनी वाढ झाली आहे. युको बँकेच्या नफ्यात सर्वाधिक 145 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्रच्या तिमाही नफ्यात 103 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.