Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

Currency Note: अर्थमंत्र्यांची 2000 च्या नोटेबाबत मोठी घोषणा, ऐकून तुम्हीही...!

2000 Rupees Note News: जर तुमच्याकडेही 2000 रुपयांची नोट असेल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी अपडेट दिली आहे.

Manish Jadhav

2000 Rupees Note News: जर तुमच्याकडेही 2000 रुपयांची नोट असेल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी अपडेट दिली आहे. नोटाबंदीच्या सुमारे 6 वर्षानंतर केंद्र सरकारकडून चलनी नोटांबाबत असे अपडेट आले आहे.

सध्या, सर्वत्र 2000 रुपयांच्या नोटेची चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत या नोटा खूपच कमी झाल्या आहेत. 2000 च्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना काही आदेश दिले आहेत का? खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत मोठा खुलासा केला आहे.

संसदेत अनेक प्रश्न विचारले

आजकाल बँकांच्या एटीएममधून (ATM) 2000 रुपयांऐवजी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2000 रुपयांच्या नोटा बाजारातून काढून टाकण्याचा सरकारचा विचार आहे का? हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला आहे.

लोकसभेत खासदार संतोष कुमार यांनी अर्थमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे खुद्द अर्थमंत्र्यांनीच दिली.

अर्थमंत्र्यांनी माहिती दिली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत खुलासा केला की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2017 आणि मार्च 2022 अखेर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 9.512 लाख कोटी आणि 27.057 लाख कोटी होते.

आरबीआयने निर्देश जारी केले नाहीत

यासोबतच अर्थमंत्र्यांनी असेही सांगितले की, रिझर्व्ह बँकेने बँकांना अशा कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. कोणत्या मूल्याच्या नोटा कधी जारी करायच्या हे बँकेनेच ठरवले आहे.

यासोबतच अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार 2019-20 पासून 2000 रुपयांची नोट छापण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT