Flipkart Sale
Flipkart Sale  Dainik Gomantak
अर्थविश्व

Flipkart Sale : Flipkart सेलमध्ये धमाकेदार ऑफर! Google Pixel 6a वर बंपर डिस्काउंट

दैनिक गोमन्तक

फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमधील अनेक मोबाईल बंपर डिस्काउंटसह विकले जातील. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट या सेलदरम्यान उपलब्ध असलेल्या डील्सबद्दलही सांगत आहे. या सेल दरम्यान Google Pixel 6a सर्वात कमी किमतीत विकला जाईल, असा खुलासा कंपनीने केला आहे.

हा आहे Google Pixel 6a फोन नुकताच भारतात सादर करण्यात आला. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल दरम्यान हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला बँक सवलतीचा लाभ घ्यावा लागेल.

फ्लिपकार्टने ट्विट करून सेलदरम्यान Google Pixel 6a ची किंमत सांगितली आहे. ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की सध्या फ्लिपकार्टची विक्री किंमत 43,999 रुपये आहे. तर स्पेशल बिग बिलियन डे सेलमध्ये टो 34,199 रुपयांना विकला जाणार.

याशिवाय प्रीपेड व्यवहारांवर 3500 रुपये अतिरिक्त दिले जातील. म्हणजेच, जर तुम्ही फोन खरेदी करतानाच पैसे भरले तर तुम्हाला 3500 रुपयांची सूट दिली जाईल. याशिवाय Axis किंवा ICICI बँक कार्ड वापरणाऱ्यांना 3000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल. यामुळे Google Pixel 6a ची किंमत रु. 27,699 इतकी कमी झाली आहे.

सेल दरम्यान, तुम्ही या फोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील घेऊ शकता. म्हणजेच जुन्या फोनची देवाणघेवाण करून तुम्ही अधिक सूट घेऊ शकता. कंपनी निवडलेल्या फोनवर 17,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे.

अशा परिस्थितीत, फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल दरम्यान, तुम्ही Google Pixel 6a जवळजवळ अर्ध्या किमतीत घरी आणू शकता. हा फोन Google Pixel Buds Pro सह सादर करण्यात आला होता. यामध्ये कंपनीचा टेन्सर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात धूळ आणि पाणी प्रतिरोधक IP67 रेटिंग आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT