Income Tax  Dainik Gomantak
अर्थविश्व

'या' तारखांमध्ये पूर्ण करावीत आर्थिक कामे

सरकारने इनकम टॅक्स भरण्याची तारीख अंतिम तारीख 15 मार्च पर्यंत वाढवली आहे

दैनिक गोमन्तक

तुम्ही आर्थिक नियोजन करत असाल तर काही महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा. शक्य असल्यास या महत्वाच्या तारखा कुठेतरी नोंदवून ठेवा. यामुळे तुम्हाला आर्थिक बाबी हाताळणे सोपे जाईल. जर शेवटची तारीख निघून गेली आणि तुम्ही ते काम केले नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे 4 महत्वाच्या तारखा सांगणार आहोत या तारखांमध्ये महत्वाची कामे करून घ्यावीत. या चार तारखांमध्ये टॅक्स (Tax) ऑडिट रिपोर्ट भरण्यासाठी, जीएसटी (GST)वार्षिक रिटर्न भरण्यासाठी, आधार पॅनशी लिंक करणे तसेच सुधारित आयटीआर दाखल करण्याची तारीखही यामध्ये आहे. ही सर्व कामे आर्थिक दृष्टिकोनातून आवश्यक आहेत, त्यामुळे वेळेत कामे करावी.

1-15 फेब्रुवारी

15 फेब्रुवारी 2022 हि टॅक्स ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. यापूर्वी त्याची तारीख 15 जानेवारी होती, परंतु कोरोना महामारीमुळे सरकारने ती वाढवून 15 फेब्रुवारी केली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत टॅक्स ऑडिट रिपोर्ट दंडाशिवाय दाखल करता येईल. दुसरीकडे आयसीएआयने नवीन आयटी पोर्टलच्या वापरामध्ये सततच्या तांत्रिक त्रुटीचे कारण देत, दंड न करता टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी 31 मर्चपर्यंत वेळ मागितला आहे. या संदर्भात भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष जे बी महापात्रा याना निवेदन दिले आहे.

2-28 फेब्रुवारी

28 फेब्रुवारी आर्थिक वर्ष 2020 - 21 साठी GST वार्षिक विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच या तारखेपूर्वी जीएसटीचा वार्षिक अहवाल दाखल करणे आवश्यक आहे. मुदत ओलांडल्यास दंड भराव लागेल. डिसेंबर महिन्यात सरकारने वार्षिक GST रिटर्न भरण्याची तारीख 2 महिन्यांनी वाढवली होती. यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर होती. आता ही अंतिम मुदत 28 फेब्रुवारी आहे. CBIC नुसार फॉर्म GSTR -9 आणि फॉर्म GSTR -9 C च्या स्वरूपात 2020-2021 आर्थिक वर्षासाठी सेल्फ-सर्टिफाइड रिकांसिलेशन स्टेटमेंट 28 फेब्रुवारीपर्यंत दाखल केली जाऊ शकतात.

3-15 मार्च

ऑडिट रिपोर्टमध्ये आयकर रिटर्न भरण्याची 15 मार्च हि शेवटची तारीख आहे. हे रिटर्न सामान्य लोक भारत नसून कार्पोरेट क्षेत्रातील लोकांसाठी हि अंतिम तारीख असते. अलीकडेच सरकारने त्याची अंतिम तारीख 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. हि नवीन तारीख मांकन वर्ष 2020 -2022 साठी आहे. याचा अर्थ कार्पोरेट करदाते 15 मार्चपर्यंत त्यांचे इनकमटॅक्स रिटर्न भरू शकतात. 2020-21 साठी इनकम टॅक्स (Income Tax) रिटर्न भरण्याची अंतिम मुदत कंपन्यांसाठी वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. कंपन्यांसाठी (Company) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर होती.

4-31 मार्च

31 मार्चपर्यंत अनेक महत्वाची कामे पूर्ण करावी. सर्वात पहिले बँक खात्यासाठी केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख, 31 मार्चपर्यंत बँक खात्यात केवायसी अपडेट केल्याची खात्री करा, तुम्हाला नंतर संधी मिळणार नाही. त्याची तारीख याआधी अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. पॅन (Pan Card) आणि आधार(Adhar Card) लिंक करणे अनेक प्रकारे आवश्यक झाले आहे. जर इपीएफ खात्यात या दोघांची लिन नसेल तर पैसे जमा करण्यात किंवा पासबुक पाहण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे अर्थी वर्ष 2020-2021साठी विलंबित किंवा सुधारित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT