Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: जुन्या पेन्शनवर केंद्र सरकारचे मोठे पाऊल, अर्थमंत्र्यांनी संसदेत केली घोषणा

Old Pension Scheme Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

FM Nirmala Sitharaman Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या मागणीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) च्या सध्याच्या रचनेत काही बदल करणे आवश्यक आहे का हे सुचवेल.

वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

NPS अंतर्गत समाविष्ट कर्मचार्‍यांच्या पेन्शन लाभांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून समिती त्यात सुधारणा करण्याबाबत सूचना देईल.

सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DOPT), विशेष सचिव, खर्च विभाग आणि अध्यक्ष, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) सदस्य म्हणून असतील.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी NPS अंतर्गत पेन्शनशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवेल.

राज्यांकडून जुनी पेन्शन लागू केल्यानंतर निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा बिगर-भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित केल्यानंतर आणि इतर काही राज्यांमधील कर्मचारी संघटनांनी मागणी केल्यानंतर आली आहे.

राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब (Punjab) आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित करण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल केंद्राला कळवले आहे.

दुसरीकडे, या राज्यांनी केंद्र सरकारला एनपीएस अंतर्गत जमा केलेला निधी परत करण्याची विनंती केली आहे.

1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या संदर्भात OPS पुनर्संचयित करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नसल्याचे अर्थ मंत्रालयाने गेल्या वर्षी संसदेत सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT