Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, केंद्र सरकार करु शकते पेन्शन योजनेत मोठा बदल

Pension Scheme: आजकाल जुनी पेन्शन योजना (OPS) बाबत बरीच चर्चा होत आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु करण्याची मागणी सरकारी कर्मचारी सातत्याने करत आहेत.
Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Finance Minister Of India Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

Pension Scheme: आजकाल जुनी पेन्शन योजना (OPS) बाबत बरीच चर्चा होत आहे. जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु करण्याची मागणी सरकारी कर्मचारी सातत्याने करत आहेत. याबाबत अनेक ठिकाणी आंदोलनेही होत आहेत.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचार्‍यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, विरोधी-शासित राज्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारल्यानंतर हे पाऊल पुढे आले आहे.

पेन्शन योजना

वित्त विधेयक 2023 च्या विचारात आणि मंजूरीदरम्यान लोकसभेत बोलताना सीतारामन म्हणाले की, समितीचे अध्यक्ष वित्त सचिव असतील. ही समिती कर्मचार्‍यांच्या (Employees) गरजा आणि आथिर्क विवेक यांच्यात समतोल साधेल.

सीतारामन म्हणाल्या की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे निवेदन प्राप्त झाले आहे. त्यामुळे पेन्शनचा हा प्रश्न पाहण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Old Pension Scheme: पेन्शनबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 'हा' फॉर्म्युला...

जुनी पेन्शन योजना

सीतारामन म्हणाल्या की, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आर्थिक विवेक राखून कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक दृष्टीकोन विकसित केला जात आहे.

हा दृष्टिकोन केंद्र आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांनी स्वीकारला जाईल. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांनी या घोषणेचे स्वागत केले.

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना सध्या खूप चर्चेत आहेत. सन 2004 पासून देशात नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली. मात्र, अलीकडे काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना स्वीकारली आहे.

Finance Minister Of India Nirmala Sitharaman
Old Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले, मोदी सरकारने लागू केली जुनी पेन्शन! जाणून घ्या कसा मिळेल फायदा

पेन्शन

जुन्या पेन्शन योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनाची संपूर्ण रक्कम सरकारमार्फत दिली जाते.

पेन्शनची रक्कम नोकरीच्या कालावधीत कर्मचाऱ्याच्या पगारातून कापली जात नाही. मात्र 2004 मध्ये एनडीए सरकारच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरु केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com