Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST कलेक्शनवर अर्थमंत्र्यांनी दिली खूशखबर, रुपयाच्या स्थितीबाबत RBI सतर्क

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: जीएसटी कलेक्शननुसार जून महिना मोदी सरकारसाठी चांगला गेला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जून 2022 साठी जीएसटी संकलनाचा डेटा जारी करताना ही माहिती दिली.

1. जून 2022 मध्ये जीएसटी संकलन 1.44 लाख कोटी रुपये होते

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले की, जून महिन्यातील जीएसटी संकलन 1.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 56 टक्के जास्त आहे.

2. दर पंधरवड्याला कच्चे तेल, डिझेल, विमान इंधनावरील करांचा आढावा

आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन कच्च्या तेल, डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधनावर (ATF) लादलेल्या नवीन करांचा सरकार दर पंधरा दिवसांनी आढावा घेईल, असे अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले. सीतारामन म्हणाल्या की हा कठीण काळ आहे आणि जागतिक स्तरावर तेलाच्या किमती बेलगाम झाल्या आहेत. "आम्ही निर्यातीला परावृत्त करू इच्छित नाही परंतु देशांतर्गत त्याची उपलब्धता वाढवू इच्छितो," असे सितारामन म्हणाल्या.

3. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर कर

सरकारने शुक्रवारीच पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर कर लागू करण्याची घोषणा केली. पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रतिलिटर 6 रुपये आणि डिझेलच्या निर्यातीवर 13 रुपये प्रति लिटर दराने कर लावण्यात आला आहे.

4. कच्च्या तेलावरही कर लादण्याची घोषणा

यासोबतच ब्रिटनप्रमाणेच स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावर कर लावण्याची घोषणा करण्यात आली. देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावर प्रतिटन 23,250 रुपये कर लावण्यात आला आहे.

5. रुपयाच्या स्थितीबाबत सरकार आणि RBI सावध

रुपयाबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रुपयाच्या मूल्याचा आयातीवर काय परिणाम होतो याची सरकारला पूर्ण कल्पना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT