Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी

देशातमध्ये अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
Single Use Plastic Ban
Single Use Plastic BanDainik Gomantak
Published on
Updated on

देशातमध्ये अनेक उत्पादने आहेत, ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मग ती तुमची आवडती कँडी असो किंवा कोणत्याही वस्तूचे प्लास्टिकचे केलेले पॅकिंग असो. पण आतापासून तुम्हाला प्लास्टिकचा कुठेही वापर दिसणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 4 वर्षांपूर्वी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याची शपथ देखील घेतली होती. (Single Use Plastic Ban Complete ban on use from 1st July)

Single Use Plastic Ban
IRCTC ने आज रद्द केल्या एकूण 101 ट्रेन; येथे पहा ट्रेनची यादी

यानंतर 1 जुलैपासून या नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात येणार आहे. आतापासून सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत ते देखील आपण जाणून घेऊया.

या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे

1 जुलैपासून देशातील सर्व राज्यांमध्ये कमी उपयुक्तता आणि जास्त कचरा निर्माण करणाऱ्या अशा 19 वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, आयात, वितरण, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घालण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येथे जाणून घ्या कोणत्या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे.

आमंत्रण कार्ड

मिठाईचे बॉक्स

स्टिरर्स

कँडी

प्लास्टिकचा फुगा

प्लास्टिकची भांडी (चमचे, ताट, प्लेट्स, कप इ.)

सिगारेटची पाकिटे

सजावटीसाठीचा थर्माकोल

Single Use Plastic Ban
कमर्शियल एलपीजी सिलिंडर दरात 198 रुपयांनी कपात; तुमच्या शहरात दर किती झाला ते तपासा?

कोणतीही संस्था या वस्तूंची विक्री करताना आढळली तर त्याचा व्यवसाय परवाना रद्द केला जाऊ शकतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) आपल्या राज्य संस्थांना याबाबत सर्व निर्देश दिले आहेत. याशिवाय सीमाशुल्क विभागाला या वस्तूंची आयात थांबवण्यास सांगण्यात आले.

त्याचबरोबर पेट्रोकेमिकल उद्योगांनाही या वस्तूंच्या उत्पादनात गुंतलेल्या उद्योगांना कच्चा माल देखील न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची बंदी लागू झाल्यानंतर, एकेरी वापराचा प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी हे पाऊल उचलणाऱ्या 60 देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. पण बंदीपेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती पाळावी लागेल. हे साध्य करण्यासाठी सरकारला बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com