FDI disinvest 17000 cr rupees from Indian market  Dainik Gomantak
अर्थविश्व

भारतीय शेअर मार्केटला झटका,परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढले 17000 कोटी

देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये 13000 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तर या आर्थिक वर्षात 69000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

गेल्या महिनाभरापासून भारतीय शेअर बाजारात (Share Market) घसरण सुरू आहे. यामागील मुख्य कारण म्हणजेच FIIS-परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री हे सांगितले जात आहे. पुढील महिन्यातही विक्रीचा हा टप्पा कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तथापि, नवीन वर्षात एफआयआय परत येण्याची अपेक्षा आहे.19 ऑक्टोबरला सेन्सेक्सने (Sensex)62261 चा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून बाजारातील घसरणीचा कल कायम आहे. सेन्सेक्स 3581 अंकांनी घसरला आहे.(FDI disinvest 17000 cr rupees from Indian market)

सेबीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये 17,900 कोटी रुपयांची विक्री केली आहे. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षापासून म्हणजे 1 एप्रिलपर्यंत भारतीय शेअर बाजारातून 87000 कोटी रुपये काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये 13000 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तर या आर्थिक वर्षात 69000 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी करण्यात आले आहेत.

भारतात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांमध्ये अमेरिकेचा 34 टक्के हिस्सा आहे. त्यापाठोपाठ मॉरिशस 11 टक्के, सिंगापूर 8.8 टक्के, लक्झेंबर्ग 8.6 टक्के, ब्रिटन 5.3 टक्के, आयर्लंड 4 टक्के, कॅनडा 3.4 टक्के, जपान 2.8 टक्के आणि नॉर्वे आणि नेदरलँड्सचा क्रमांक लागतो.भारतीय FPI गुंतवणुकीत या 10 देशांमध्ये 83 टक्के वाटा आहे. इक्विटी गुंतवणुकीच्या बाबतीत, यूएस 37 टक्के आहे, तर मॉरिशस 11 टक्के आहे. कर्ज गुंतवणुकीत सिंगापूर अव्वल आणि लक्झेंबर्ग दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात जोरदार विक्री होत असताना गुंतवणूकदारांचे एकूण 8,21,666.7 कोटी रुपयांचे भांडवल बुडाले होते . दिवसभरातील व्यवहारादरम्यान एका वेळी सेन्सेक्स 1,624.09 अंकांनी खाली आला होता. सेन्सेक्समध्ये मोठ्या घसरणीमुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल रु. 8,21,666.7 कोटींनी घसरून रु. 2,60,98,530.22 कोटी रुपये झाले होते .

त्याच वेळी, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप मंगळवारी 1,23,474.43 कोटी रुपयांनी घसरून 2,59,75,055.79 कोटी रुपयांवरआला होता . अशा प्रकारे, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप दोन दिवसांत 9,45,141.13 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 11 खून, अपहरण, चोऱ्या! गुन्हेगारीत परप्रांतीयांचा वाढता सहभाग चिंताजनक; कृतिदल स्‍थापण्‍याची मागणी

Nikolai Patrushev Goa visit: गोव्याच्या सागरी क्षेत्रातील प्रगतीची रशियाकडून प्रशंसा! रशियाचे राष्ट्रपती साहाय्यक निकोलाईंनी दिली भेट

IFFI 2025: 'गोव्यात या, चित्रीकरण करा'! CM सावंतांचे आवाहन; राज्‍याला चित्रपट निर्मिती हब बनवण्‍याचे स्‍वप्‍न

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मोठा फेरबदल! 34 पोलिस निरीक्षक, 6 उपअधीक्षकांच्या बदल्या; उत्तर गोव्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांचीही उचलबांगडी

Horoscope: महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या; घाई करू नका! महत्वाचे निर्णय इतरांना सांगू नका.. वाचा तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT