Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: 12व्या हप्त्यानंतर लाखो शेतकऱ्यांसाठी खूशखबर, तुम्हीही आनंदाने माराल उड्या!

PM Kisan: शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष सुविधा दिल्या जातात.

दैनिक गोमन्तक

PM Kisan: शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. तुम्हीही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक विशेष प्रयत्न करत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारकडून एक विशेष योजना चालवली जात आहे, ज्याअंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत आहे. उत्तर प्रदेश शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचे कर्ज माफ झाले आहे.

तसेच, उत्तर प्रदेशातील अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ केले जात आहे. या यादीत दोन हेक्टरपेक्षा कमी म्हणजेच पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसलेले शेतकरी अल्प आणि अत्यल्प शेतकरी मानले जातात. ही योजना सन 2017 मध्ये सुरु करण्यात आली असून गेल्या 5 वर्षात सरकारने 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 19 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा (Farmer) समावेश आहे.

तसेच, ही योजना सन 2017 मध्ये सुरु करण्यात आली असून गेल्या 5 वर्षात सरकारने 86 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 19 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. अर्जदार शेतकरी उत्तर प्रदेशचा रहिवासी असावा. यासोबतच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक त्याच्या बँक (Bank) खात्याशी जोडण्यात यावा. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त ऑफलाइन अर्ज करावा लागेल.

शिवाय, तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित योजनेचा फॉर्म घेऊ शकता. यानंतर, सर्व तपशील भरुन आणि कागदपत्रे जमा करुन फॉर्म सबमिट करावा लागेल. नंतर हा तपशील कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर सादर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT