सोशल मीडिया कंपनी फेसबुक इंक (Facebook) पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीला नवीन नावाने रिब्रँड करण्याची योजना आखत आहे. द व्हर्जमधील एका अहवालानुसार, फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Facebook CEO) मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) 28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या कनेक्ट कॉन्फरन्समध्ये नाव बदलण्यावर चर्चा करू शकतात. तथापि, अहवालात असे म्हटले गेले आहे की रिब्रँडिंग त्या अगोदरही होऊ शकते. (Facebook is planning to change name new plan of Mark Mark Zuckerberg)
या बदलांनंतर फेसबुकच्या मूळ अॅप आणि फेसबुक पुरवत असलेल्या सेवांमध्ये कोणताही बदल होणार होणार नाहीत .हे एका मूळ कंपनीच्या अंतर्गत ठेवले जाईल ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लाखो वापरकर्त्यांसह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप सारख्या इतर ब्रँडचा समावेश असेल. Google ने Alphabet Inc. ची मूळ कंपनी बनवून आधीच अशीच रचना राखली आहे. रीब्रँडिंगनंतर, फेसबुकचे सोशल मीडिया अॅप हे मूळ कंपनीच्या अंतर्गत सेवा पुरवेल . इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपअशा आऊटलूक असे इतर प्लॅटफॉर्म देखील या मूळ कंपनीमध्ये येतील.
मार्क झुकेरबर्गने 2004 मध्ये हे सोशल नेटवर्क सुरू केले. फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग यांनी जुलै महिन्यात एका कॉल मध्येसांगितले होते की कंपनीचे भविष्य 'मेटावर्स' मध्ये आहे. मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला (आभासी जग) अधिक प्राधान्य देण्याची भूमिका होय. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल जगात फिरत त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात.
18 ऑक्टोबर रोजी फेसबुकने सांगितले की, मेटावर्स तयार करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये युरोपियन युनियनमध्ये 10,000 लोकांना नियुक्त करण्याची योजना आहे. सध्या मात्र सुरु असणाऱ्या या Facebook च्या नाव बदलासंदर्भातील चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं फेसबुकने स्पष्ट केलंआहे.
आता फेसबुकने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा कंपनीला त्याच्या व्यावसायिक पद्धतींवर अमेरिकन सरकारच्या वाढत्या तपासणीचा सामना करावा लागत आहे. दोन्ही पक्षांतील कायदेतज्ज्ञांनी कंपनीवर बहिष्कार टाकला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.