Raghuram Rajan Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Economy: माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोलाचा सल्ला

चीनचे विकास मॉडेल भारतासाठी फायदेशीर नाही

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghram Rajan) यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा आणि मोलाचा सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला सर्व्हिस लीड एक्सपोर्ट मॉडेल तयार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग लीड एक्सपोर्ट मॉडेलवर काम केले तर त्याचा GDP वाढीचा दर वेगाने वाढण्यास मदत होणार नाही. असे मत त्यांनी मांडले आहे.

उदारीकरणाचा अनेक देशांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. जगातील अनेक देशांमधील असमानता यामुळे दूर होण्यास मदत झाली. असे रघुराम राजन जागतिकीकरण आणि हवामान बदल या विषयावर बोलताना मत मांडले. औद्योगिक अर्थव्यवस्था आणि इतर देशांमधील आर्थिक विषमता दूर करण्यात उदारीकरणाचे मोठे योगदान आहे. सेवा क्षेत्रातील उदारीकरणामुळे औद्योगिक आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना फायदा झाला. यापैकी बर्‍याच सेवा अशा आहेत की त्या अस्तित्वात नाहीत आणि त्यांचा पर्यावरणावरही फारसा प्रभाव पडत नाही, परंतु पर्यावरणातील बदलामुळे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्या खूप मदत करतात. असे रघुराम राजन म्हणाले.

राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या पाहिले तर संपूर्ण उदारीकरणामुळे उत्पादन क्षेत्रात चांगले परिणाम मिळतात. इतर सेवांप्रमाणे, सर्व सेवा देशभरात वितरित केल्या जाऊ शकतात आणि मोठ्या शहरांवरून त्याचा भार कमी केला जाऊ शकतो. असे त्यांनी म्हटले. मोठ्या शहरांची गर्दी कमी करण्यात आणि त्यांना राहण्यायोग्य बनवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या भूमिका बजावतात. भारतातील सेवा क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यात ते यशस्वी ठरले आहेत. भारताने सेवा क्षेत्राला पुढे ठेवून जीडीपी वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. असा सल्ला राजन यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: 'कारागृह', सुधारगृह की पंचतारांकित हाॅटेल? भिंतीआड सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाईची गरज

Karnataka High Court: 'आई-वडिलांची सेवा करणं मुलगा-मुलीची जबाबदारी, जावई-सुनेची नाही', पत्नीच्या स्वातंत्र्यावर हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

Job Opportunities: 'नोकरी देता का नोकरी?' गोव्यातील उच्चशिक्षित तरुणाईची व्यथा; ॲप्रेंटिसशीपच्या आश्वासनांपासून बेरोजगारीच्या नैराश्यापर्यंतचा प्रवास

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT